फलटण टुडे दि. १४ :-
फलटण तालूका क्रीडा शिक्षक संघटनेची सहविचार सभा व नविन पदाधिकारी निवड मुधोजी हायस्कूल मधील ड्रॉईंग हॉल येथे जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी फलटण तालुका क्रीडा शिक्षक संघटनेचे कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यावेळी तालूका क्रीड संघटनेेचे आजी माजी पदाधिकारी व तालुक्यातील क्रीडा शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. .
या सहविचार सभेत मालोजीराजे शेती विद्यालय,फलटण येथिल क्रीडा शिक्षक उत्तमराव घोरपडे यांची फलटण तालूका क्रीडा शिक्षक संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रशालेच्या वतीने त्यांचा सत्कार प्रशालेचे प्राचार्य ज्ञानदेव कोळेकर यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी बोलतान प्रशालेचे प्राचार्य ज्ञानदेव कोळेकर यांनी सांगितले की आपल्या प्रशालेतील क्रीडा शिक्षक उत्तमराव घोरपडे यांची फलटण तालूका क्रीडा शिक्षक संघटनेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यामूळे त्यांच्या वर तालुका स्तरावर काम करण्याची नवीन जबाबदारी त्यांना मिळाली आहे. त्यामूळे त्यांना क्रीडा क्षेत्रात चांगले काम करून एक वेगळा ठसा उमटवण्याची संधी मिळाली आहे. त्या संधीचे सोने ते नक्कीच करतील.
तसेच विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षण हे खूप महत्त्वाचे असून मुलांना मार्गदर्शन मिळाले की मुले खूप मोठे यश संपादन करतात. यासाठी अशा काही संघटना कार्यरत असतात त्याचा उपयोग विद्यार्थांसाठी व्हावा तसेच या संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या खेळांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळत राहावे. असे मार्गदर्शक उत्तम घोरपडे यांचे विधार्थांना मिळत रहावे. उत्तम घोरपडे यांची फलटण तालूका क्रीडा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रशालेच्या वतीने त्यांचा सत्कार व अभिनंदन करतो व त्यांच्यावर फलटण तालूका क्रीडा संघटनेने टाकलेला विश्वास ते सार्थ करतील व चांगले काम करून नावलौकिक मिळतील. असा विश्वास प्रशालेचे प्राचार्य ज्ञानदेव कोळेकर यांनी व्यक्त केला .
यावेळी उत्तमराव घोरपडे यांची प्राचार्य तसेच उपप्राचार्या कदम मॅडम व सर्व सहकारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील निवडीबद्दल व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोज कदम यांनी केले तर आभार सुरेंद्र फाळके यांनीं मानले.