फलटण तालूका क्रीडा संघटनेच्या नवनिर्वाचित पदाधिकार्यांचे अभिनंदन करताना महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष मनोहर यादव व इतर
फलटण टुडे दि. १० :-
मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज , फलटण येथील चित्रकला हॉलमध्ये फलटण तालूका क्रीडा संघटनेची सहविचार सभा व नविन कार्यकारणी निवड जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक, महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष मनोहर यादव, कोल्हापूर विभागीय क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आर, वाय जाधव, मुधोजी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य पंढरीनाथ कदम, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय फलटण चे प्राचार्य डॉ. सागर निबांळकर मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज,फलटण चे प्राचार्य बाबासाहेब गंगवणे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत फलटण तालुका शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेची सहविचार सभा व नवीन तालुका कार्यकारणी निवड करण्यात आली.
नवनर्वाचित कार्यकारणी पुढील प्रयोग :-
अध्यक्ष- काशिनाथ सोनवलकर
उपाध्यक्ष – उत्तमराव घोरपडे
कार्याध्यक्ष – दशरथ लोखंडे
सचिव- अजय कदम
सहसचिव – पंकज पवार
खजीनदार -संदिप ढेंबरे
संघटक -तुषार मोहिते
– सचिन धुमाळ
– आप्पासाहेब वाघमोडे
या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर,जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक, महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष मनोहर यादव कोल्हापूर विभागीयाक शिक्षण शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आर, वाय जाधव, फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासनाधिकारी अरविंद निकम यांनी सर्व नवनिर्वाचीत कार्यकारणीचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.