फलटण दि. १० ( फलटण टुडे ) :
मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण येथे ७ ऑक्टोबर व ८ ऑकटोबर रोजी प्रशालेमध्ये फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी तथा महाराष्ट्र राज्य खो -खो असोसिएशनचे अध्यक्ष मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्पर्धांचे (निबंध,वक्तृत्व व चित्रकला)आयोजन मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये करण्यात आले होते . त्या स्पर्धेत अनेक विद्यार्थांनी सहभाग नोंदवला होता . या स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून फलटण -कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपकराव चव्हाण तर अध्यक्षस्थानी फलटण एज्युकेशन सोसायटीचे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य मा. शिवाजीराव घोरपडे, प्रमुख उपस्थिती मधे फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी मा. अरविंद निकम , मुधोजी हायस्कूल चे प्राचार्य बाबासाहेब गंगवणे होते.
यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपकराव चव्हाण यांनी सांगितले की फलटण एज्युकेशन सोसायटीचे मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज हे फलटण संस्थान काळातील नावाजलेले जुने हायस्कूल असून या संस्थेमध्ये अनेक कवी , लेखक , सायंटिस्ट असे प्राचार्य लाभले आहेत . तसेच श्रीमंत मालोजीराजे साहेबांनी आपल्या तालुक्यातील खेडोपाड्यातील गरीब कुटुंबातील मुले आहेत ही शिक्षणापासून वंचित राहू नये त्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे म्हणून फलटण या तालूक्याच्या ठिकाणी त्यांना शिक्षणाची या संस्थेच्या माध्यमातून दारे खुली केली व या संस्थेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी मोठे अधिकारी , लेखक , प्रसिद्ध डॉक्टर , वकील तयार झाले तसेच अनेक गुणवंत विद्यार्थी घडवण्याचे काम या संस्थेने केले आहे . तसेच मुधोजी हायस्कूल हे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे विद्यापीठ आहे .
आपण कोणत्याही शाखेत शिकत असलो तरी आपल्याला तालुक्याचा व जिल्ह्यचा इतिहास माहिती पाहिजे स्पर्धा परीक्षेसाठी हा इतिहास माहिती असणे आवश्यक आहे . यासाठी फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी मा. श्रीमंत संजीवराजे यांनी फलटण एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून नवीन काहीतरी विद्यार्थ्यांना दिलं गेलं पाहिजे नविन शिक्षण मिळालं पाहिजे या हेतूने विविध नवनवीन अभ्यासक्रम तसेच नवनवीन शाखांची उभारणी करून ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून त्या क्षेत्रामध्ये विद्यार्थी घडवण्यासाठी त्यांचा नेहमीच पुढाकार असतो . त्याचे उत्तम उदाहरण द्यायचे म्हटले तर विद्यार्थ्यांना नीट व जेई या परीक्षांना सामोरे जात असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो विद्यार्थांना जेई व नीट यामध्ये कमी गुण पडतात . त्यासाठी जे ज्ञान असले पाहिजे ते मिळत नाही . त्यामुळे श्रीमंत संजीवराजे यांच्या प्रयत्नाने इयत्ता आठवीपासून पुढे जेई व नीट परीक्षेच्या अभ्यासक्रमाची तयारी करून घेण्यासाठी आपल्या संस्थेमध्ये श्रीमंत मालोजीराजे अभ्यास केंद्र चालू करून विद्यार्थांची या स्पर्धेची तयारी करून घेण्यासाठी त्यांनी श्रीमंत मालोजीराजे अभ्यास केंद्र फलटण एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून सुरू केले व सामान्य कुटुंबातील मुलाला व गरीब मुलांना जेई व नीट या परीक्षेचे ज्ञान मिळवून देण्यासाठी त्यांनी या अभ्यासिका केंद्रास सुरुवात आपल्या संस्थेत केली.
श्रीमंत मालोजीराजे अभ्यास केंद्राची वाटचाल यशस्वीरित्या चालू आहे. तसेच मुधोजी मधील अनेक विद्यार्थ्यांनी अनेक स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तम यश संपादन केले असून त्यामुळे तालुक्याचे व फलटण एज्युकेशनचा नावलौकिक वाढला आहे व या सर्वांमुळे मुधोजीचे नाव एका वेगळ्या स्तरावर नेऊन ठेवले गेले आहे. याचे श्रेय फक्त आणि फक्त फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे यांनाच द्यावे लागेल असे प्रतिपादन त्यांनी केले व त्यांनां त्यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीमंत संजीवराजे यांना दीर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छा दिल्या .
अध्यक्षीय भाषणात फलटण एज्युकेशन सोसायटीच्या गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य मा. शिवाजीराव घोरपडे म्हणाले प्रत्येक विद्यार्थ्याला आपले ध्येय माहिती पाहिजे व हे ध्येय साध्य करण्यासाठी खूप परिश्रमाची व अथक प्रयत्नांची गरज लागते ते घेतले तर यश निश्चीत मिळते . विद्यार्थात असलेले कलागुण बाहेर काढण्यासाठी मुलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी विविध उपक्रम आपल्या संस्थेमध्ये राबवले जात आहेत. त्यामध्ये भाग घेऊन आपले कलागुण या ठिकाणी सादर करून एक आपलं नाव वेगळ्या स्तरावर उंचावण्याची ही संधी विद्यार्थांना आहे व आपण ह्या संधीचे सोनं केलं पाहिजे व आपण यश संपादन केला पाहिजे.
यासाठी आपल्या संस्थेने श्रीमंत संजीवराजे यांच्या वाढदिवसानिमित्त चित्रकला, निबंध व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन केले होते. त्यामध्ये चित्रकला , वक्तृत्व व निबंध या स्पर्धेमध्ये भाग घेऊन अनेक विद्यार्थ्यांनी आपले कलागुण सादर करून आपला वेगळा ठसा उमटवलेला आहे .यामुळे या स्पर्धेला एक वेगळं महत्व प्राप्त झाले आहे. असे प्रतिपादन शिवाजीराज घोरपडे यांनी केले.
प्रास्ताविक मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फलटणचे प्राचार्य मा. बाबासाहेब गंगवणे यांनी केले यावेळी फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी अरविंद निकम , मुधोजी ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य एम के फडतरे , मधोजी हायस्कूल चे उपप्राचार्य ए वाय ननावरे , मुधोजी हायस्कूल चे पर्यवेक्षक शिवाजीराव काळे, अविनाश नरुटे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी माध्यमिक विभागाच्या सकाळ व दुपार विभागातील आणि ज्यूनिअर विभागाच्या अनेक शिक्षकांनी परिश्रम घेतले व या स्पर्धा यशस्वी पार पाडल्या त्याबद्दल उपप्राचार्य ए वाय ननवरे यांनी धन्यवाद दिले व सर्वांचे आभार मानले.
चौकट :
यावेळी मुधोजी हायस्कूल चा विद्यार्थी कु.यश मोझर याने श्रीमंत संजीवराजे यांचे पेंटींग केलेल्या फोटोचे अनावरण फलटण – कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार दिपकराव चव्हाण यांच्या शुभहस्ते करण्यात आले.