बारामती ( फलटण टुडे) :
बारामती तालुक्यातील ज्ञानसागर गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या यशामध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. तो म्हणजे रविवार दि.9 ऑक्टोबर 2022 रोजी सोलापूर या ठिकाणी घेण्यात आलेल्या 16 वी महाराष्ट्र राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेमधील यश संपादन करून तालुक्याबरोबरच ज्ञानसागरचे नाव संपूर्ण जिल्ह्यात झाले आहे.या राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेमधील यशस्वी विद्यार्थ्यामध्ये कु.सानवी अमोल गुळवे -तृतीय क्रमांक (इ.6 वी), कु.अविष्का राहुल वाघोदे -चौथा क्रमांक (इ.6 वी ), ओम बापूराव देवकाते -पाचवा क्रमांक (इ.3 री)* यांनी उत्तुंग यश संपादन केले. अशा विविध स्पर्धा आयोजित केल्याने विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्वास वाढण्यास मदत होते व नवीन काहीतरी करण्यासाठी प्रेरणा मिळते.या विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी अबॅकस प्रशिक्षिका ज्योती ढाळे व कीर्ती रसाळ यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक संस्थेचे अध्यक्ष सागर आटोळे, उपाध्यक्षा रेश्मा गावडे, सचिव मानसिंग आटोळे, पल्लवी सांगळे, अलका आटोळे,दिपक सांगळे, वर्षा भरणे, सीईओ संपत जायपत्रे, विभाग प्रमुख गोरख वणवे, मुख्याध्यापक दत्तात्रय शिंदे, दिपक बिबे, नीलिमा देवकाते, राधा नाळे, स्वप्नाली दिवेकर व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारीवर्ग यांनी केले.