५१ हजार रुपयाचा धनादेश फलटण च्या ग्रामदैवत भैरवदेव देवस्थानला श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा ) यांचा शुभहस्ते सुपूर्द

भैरवदेव देवस्थान ट्रस्ट’चे अध्यक्ष अँड.अशोकराव जाधव यांच्याकडे ५१ हजार चा धनादेश सुपूर्द करताना श्रीमंत संजीवराजे (बाबा) यावेळी नितीनभैय्या भोंसले-पाटील, मा.नगरसेवक किशोरसिंह नानासाहेब नाईक निंबाळकर (भैय्या), मा.नगरसेविका सौ.प्रगती जगन्नाथ (भाऊ) कापसे, इत्यादी मान्यवर

फलटण दि. ०९ ( फलटण टुडे ) :

फलटण ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिराच्या जीर्णोद्धारसाठी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कै.सौ.लिलावती धोंडिबा शिंदे (झेंडे) यांच्या स्मरणार्थ श्री.राजेश धोंडिबा शिंदे (झेंडे), (रा.मुरुम ता.फलटण व लोणंद ता.खंडाळा) यांनी रु.५१,०००/- धनादेशाचा चेक श्रीमंत संजीवराजे (बाबा) यांच्या शुभहस्ते भैरवदेव देवस्थान ट्रस्ट’चे अध्यक्ष अँड.अशोकराव जगन्नाथ जाधव यांच्याकडे सुपूर्द केला, यावेळी श्रीमंत संजीवराजे (बाबा) यांच्या शुभहस्ते श्री.राजेश शिंदे (झेंडे) यांचा यथोचित सत्कार करण्यात आला, याप्रसंगी मा.उपनगराध्यक्ष श्री.नितीनभैय्या रमेशचंद्र भोंसले-पाटील, मा.नगरसेवक श्री.किशोरसिंह नानासाहेब नाईक निंबाळकर (भैय्या), मा.नगरसेविका सौ.प्रगती जगन्नाथ (भाऊ) कापसे, भैरवदेव देवस्थान ट्रस्ट’चे उपाध्यक्ष श्री.प्रदीप पवार, श्री.रामभाऊ पवार, श्री.शाम कापसे, श्री.भाऊ कापसे, श्री.गोरख पवार, श्री.सनी पवार, श्री.अमोल कापसे, श्री.योगेश कापसे, श्री.जित पवार, श्री.मनोदीप पवार, श्री.कार्तिक रविंद्र शिंदे (झेंडे), श्री.प्रज्वल धनंजय शिंदे (झेंडे), श्री.रोहित शिंदे, श्री.करण जाधव, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!