फलटण येथील डी एड चौक येथे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पुतळा जाळताना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते
फलटण दि ५ ( फलटण टुडे ):
फलटण शहरातील गजानन चौकात भारतीय जनता पार्टी च्या वतीने श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर याचा पुतळा जाळून निषेध केल्याने यामुळे राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक झाले व त्यांनी डी.एड चौक याठिकाणी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा पुतळा
जाळला त्यामूळे फलटण शहरासह तालुक्यात काहीशे तंग झाले असून पोलीस प्रशासनही या घटनेमुळे अलर्ट झाले आहे.
एकीकडे भाजपच्या वतीने राष्ट्रवादी चे नेते तथा माजी सभापती रामराजे निंबाळकर यांचा पुतळा जाळण्यात आला असता दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी डि .एड चौकात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर पुतळा जाळुन निषेध केला आगामी काळात भाजप व राष्ट्रवादी मध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे. एकंदरीतच फलटण शहरात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता असल्याने पोलीस प्रशासन सतर्क झाले असून पोलीस प्रशासनाने फलटण शहरात बंदोबस्त तैनात केला आहे.