जय तुळजा भवानी मंडळाच्या वतीने आयोजित नवरात्रोत्सवानिमित्त गुणवंत कौतुक सन्मान संपन्न

अहिल्यानगर (पणदरे) ता. बारामती येथील जय तुळजा भवानी मंडळाच्या वतीने आयोजित नवरात्रोत्सवानिमित्त गुणवंत कौतुक सन्मान सोहळ्यानिमित्त बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष दुधेबावी ग्रामविकास प्रतिष्ठानचे शशिकांत सोनवलकर , प्रमुख अतिथी अशोक तवारे, कृष्णचंद्र शितोळे, श्रीरंग तावरे , सोपनराव आटोळे , विठ्ठल कोकरे होते.
मेंढपालन करुन नीट परीक्षेत घवघवती यश संपादन करणारी उत्कर्षा केसकर यांना शैक्षणिक कार्यासाठी आर्थिक मदत केली. CET मध्ये राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण वसुधा फडतरे यांचा गुणगौरव करण्यात आला. विरगुंळा ज्येष्ठ नागरिक संघाच्या ज्येष्ठांचा सत्कार वृक्ष देऊन केला. नेत्रतपासणी शिबीर , जि. प.शाळा अहिल्यानगरचे विद्यार्थ्यांचा विविध सांस्कृतिक कलागुण दर्शन कार्यक्रम आयोजन करुन त्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
मंडळाचे अध्यक्ष ग्रामीण साहित्यिक प्रा. रवींद्र कोकरे यांनी विविध सामाजिक उपक्रमातून मनोरंजनाबरोबरच सुप्त कलागुणांना वाव ,गुणवंत तारे यांचे कौतुक ही भूमिका मांडली.
कार्यक्रमास जि.प. शाळा वरिष्ठ शिक्षिका मीना जगताप , सीमा कांबळे , जयवंत कांबळे , अशोक देवकाते , दिनकर काळे , अमोल मुळीक , गंगाधर फडतरे या मान्यवरांसह मंडळाचे विश्वस्त नंदकुमार जाधव , प्रदिप कोकरे , आदेश कोकरे , बापूराव कोकरे , महेश झोरे , भानुदास कोकरे , विश्वनाथ कोकरे , मधुकर कोकरे , अमोल भिसे , पंचक्रोशीतील भाविक , महिला , विद्यार्थी  , पालक बहुसंख्येने उपस्थित होते. सूत्रसंचलन सचिन कोकरे. प्रास्तविक आबासाहेब कोकरे , आभार नितीन कोकरे यांनी  मानले.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!