बारामती दि. २४ (फलटण टुडे ): बारामती मधील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय आयोजित कवी मोरोपंत वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. विविध गटात ही स्पर्धा पार पाडण्यात आल्या. यावेळी अनेक महाविद्यालयातील स्पर्धकांनी या स्पर्धेत उत्सफुर्तपणे सहभाग नोंदवला.
या स्पर्धेसाठी विविध स्पर्धेकांनी भाग घेऊन आपले कलागुण दाखवले. यावेळी कनिष्ठ गटात शारदाबाई पवार महिला आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज शारदानगर, बारामती येथील इयत्ता ११ वी विज्ञान शाखेत शिकणारी विद्यार्थीनी श्रद्धा महादेव चोपडे हिने यास्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले .
यावेळी तिला प्रसिद्ध नाटककार मकरंद साठे यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. पारितोषकाचे स्वरूप रोख रक्कम रुपये ७००० / – आणि प्रशिस्तीपत्र देण्यात आले असून तिने ” शांता शेळके- मराठी संस्कृतीचे लेणे” याविषयावर आपले वक्तृत्व गुण सादर केले.
या यशाबददल संस्थेचे चेअरमन तथा महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार , बारामती टेक्सटाईल च्या अध्यक्षा मा. सुनेत्राताई पवार , संस्थेचे सीईओ निलेश नलावडे, संस्थेच्या एच आर हेड गार्गी दत्ता , संस्थेचे समन्वयक प्रशांत तनपुरे यांनी यशस्वी विद्यार्थीनी श्रद्धा महादेव चोपडे हिचे या यशाबद्दल अभिनंदन केले.
तसेच यावेळे तिला मार्गदर्शन करणारे प्राध्यापिका ज्योती जोशी, प्राध्यापक स्वामीराज भिसे व प्राध्यापिका सुनीता कुलकर्णी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्या बद्दल त्यांचेही अभिनंदन करण्यात आले.
तसेच विविध स्तरातून व मान्यवरांकडून श्रद्धा चोपडे हिचे कौतुक व अभिनंदन करण्यात आले