बारामती :
बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने आयोजित केलेला राजकोट औद्योगिक प्रदर्शन अभ्यास दौरा लघु उद्योजकांना अत्यंत उपयुक्त ठरला असून मशीन उत्पादक संघटना बारामती परिसरातील उद्योजकांना मदत करणार असल्याची माहिती अध्यक्ष धनंजय जामदार यांनी दिली.
या अभ्यास दौऱ्यामध्ये बारामती एमआयडीसी व परिसरातील सुमारे 100 उद्योजक सहभागी झाले होते प्रदर्शनात देशविदेशातील 400 हून अधिक नामांकित कंपन्यांनी अत्याधुनिक मशिनरीचे उत्पादन प्रक्रिया प्रत्यक्ष पाहण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली होती यामुळे उद्योजकांना मशीनरीचे कार्यप्रणाली व उपयुक्तता जागेवरच पाहण्याची
संधी मिळाली. अनेक उद्योजकांनी नवीन मशिनरी खरेदीसाठी जागेवरच वाटाघाटी करून बुकिंग केले. या अभ्यास दौर्याच्या नियोजनासाठी बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन चे सचिव अनंत अवचट, सदस्य महादेव गायकवाड, अंबिरशाह शेख , मनोहर गावडे आदींनी विशेष परिश्रम घेतले.
राजकोट मधील यंत्रसामुग्री प्रदर्शनाचे संयोजक मशीन टूल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन च्या पदाधिकाऱ्यांनी बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या शिष्टमंडळातील उद्योजकांचे स्वागत करून एक बैठक आयोजित केली व बारामती परिसरातील उद्योजकांना आवश्यकता असेल तेव्हा दर्जेदार मशिनरी किफायतशीर दरात उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही दिली तसेच मशिनरी निवड करण्यासाठी किंवा काही समस्या उद्भवल्यास बारामतीकरांना त्याबाबत विशेष सहकार्य करणार असल्याचेही सांगितले.प्रदर्शनाबरोबरच राजकोट परिसरातील औद्योगिक कंपन्यांना बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या शिष्टमंडळाने भेटी देऊन लेथ मशीन, सबमर्सिबल मोटर पंप, बेअरिंग उत्पादक कारखान्यांना भेटी देऊन उद्योजकांनी उत्पादन प्रक्रियेची प्रत्यक्ष माहिती करून घेतली. राजकोट मधील या इंडस्ट्री व्हिजीट साठी बारामती मधील उद्योजक विष्णू दाभाडे, हरीश खाडे, अनिल गोसावी,आप्पासाहेब जाधव यानी व्यवस्था केली.
बारामतीच्या औद्योगिक क्षेत्रातील ईतिहासात बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या नेतृत्वाखाली इतक्या मोठ्या संख्येने लघुउद्योजक सहभागी होऊन परराज्यातील मोठा औद्योगिक अभ्यास दौरा यशस्वीपणे पार पडला
बारामती एमआयडीसी व परिसरातील उद्योजकांच्या समस्या सोडवणेचा निरंतर प्रयत्न करत असताना उद्योग व्यावसाय वाढवण्यासाठी बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन उद्योजकांसाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शनांना भेटी, अभ्यास दौरे, उद्योगांना भेटी, चर्चासत्रे, आदी उपक्रम सातत्याने राबवत उद्योजकाच्या ज्ञानात भर पडत आहे व व्यवसाय वाढीसाठी उपयुक्त ठरत आल्याची माहिती अध्यक्ष धनंजय जामदार यांनी दिली.