श्रीमंत संजीवराजे ना.निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन – गणेश तांबे

फलटण तालुक्याचे भाग्यविधाते, युवा नेतृत्व आदरणीय श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) अध्यक्ष – खो-खो असोसिएशन महाराष्ट्र राज्य, मा.अध्यक्ष, जिल्हा परिषद सातारा. यांच्या वाढदिवसानिमित्त आई प्रतिष्ठान वाठार निंबाळकर आयोजित तालुकास्तरीय भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. सदर स्पर्धा या ३ गटांमध्ये होणार असून पहिला गट इयत्ता १ ली ते ५ वी असणार आहे. त्यासाठी विषय निसर्गचित्र आहे. गट क्रमांक २ इयत्ता६ वी ते १०वी साठी विषय निर्मल ग्राम अभियान आहे आणि शेवटचा गट क्रमांक ३ इयत्ता ११ वी पासून पुढे (खुला गट ) असणार आहे व विषय फलटणची हरितक्रांती असा  आहे. प्रत्येक गटाचे ३ क्रमांक काढले जाणार असून एकूण ९ बक्षीसे असणार आहेत. बक्षिसाचे स्वरूप-  सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व पुस्तक  असे राहील. स्पर्धेतील सहभाग हा विनामूल्य आहे.सर्व स्पर्धकांनी 12 x 18 साईजच्या कागदावर चित्र रेखाटून त्यावर स्वतःचे संपूर्ण नाव, शाळेचे नाव, इयत्ता व मोबाईल नंबर लिहावा. सदर काढलेली सर्व चित्रे 6 ऑक्टोंबर 2022 पर्यंत आई किराणा स्टोअर्स मध्ये ( बालाजी बाजार शेजारी स्वामी विवेकानंद नगर ) फलटण येथे जमा करावीत. स्पर्धेतून निवडलेल्या चित्रांचे क्रमांक व्हाट्सअप ग्रुप वर प्रसिद्ध केले जातील. तरी सर्वांनी जास्तीत जास्त चित्रकला स्पर्धेत सहभाग घ्यावा. असे आवाहन आई प्रतिष्ठान वाठार निंबाळकरचे संस्थापक अध्यक्ष श्री.गणेश तांबे यांनी केले आले.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!