गुणवत्ता यादी जाहीर करण्यापूर्वी कागदपत्रांची पडताळणी करावी: हेमचंद्र शिंदे
बारामती : कोविड मुळे वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया गेली दोन वर्ष प्रत्यक्षात कागदपत्र पडताळणी न करताच प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत होती प्रत्यक्ष प्रवेश मिळालेले संस्थेमध्ये कागदपत्रांची तपासणी होत होती यावेळी केवळ कागदपत्रातील किरकोळ त्रुटी झाल्याने अर्ज भरताना झालेल्या चुका यामुळे मिळालेला प्रवेश रद्द होत होता.त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणा पासून वंचित रहावे लागले त्यामुळे या वर्षी तरी (कोविड चे दोन वर्षी सोडून ) पूर्वी प्रमाणे सोमारासमोर कागदपत्रे तपासावी
अशी राज्यातून होत आहे या साठी हेमचंद्र शिंदे प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शक यांनी मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री व प्रवेश प्रकिया सीईटी सेल आयुक्त यांना निवेदन दिले आहे.
2019 पर्यंत राज्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी सुरुवातीला प्रत्यक्षात कागदपत्र तपासणी केल्यानंतर आढळणाऱ्या त्रुटी दूर केल्या जाऊन त्यानंतरच मेरिट क्रमांक चे वाटप केले जात होते त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होत नव्हते. पद्धतीने प्रत्यक्षात समोरासमोर विद्यार्थ्यांना निमंत्रित करून प्रथम कागदपत्रांची तपासणी करावी व त्यानंतरच मेरिट क्रमांकाचे वाटप करावे अशी मागणी केली आहे.
कोविड च्या दोन वर्षात कागतपत्रे फक्त डाउनलोड करून पाठवली जात होती त्यानंतर ज्या ठिकाणी प्रवेश मिळणार त्या संस्थेमार्फत कागतपत्रे तपासली जात होती त्यामधील आडनाव मधील त्रुटी, काना, मात्रा, वेलांटी किंवा फॉर्म भरताना चुकून एस च्या ऐवजी नो झाले तरीही फॉर्म बाद करून प्रवेश रद्द होत होता
कोवीड संपला तरी तीच कार्यपद्धती आहे त्यामध्ये राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते ते होऊ नये म्हणून राज्य शासनाकडे निवेदना मार्फत सर्व माहिती दिली आहे लवकरच सकारत्मक निर्णय होईल अशी आशा प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शक हेमचंद्र शिंदे यांनी केली आहे.
फोटो ओळ : हेमचंद्र शिंदे