गोखळी ( प्रतिनिधी) : फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील पशुवैद्यकीय दवाखाना गुणवरे अंतर्गत मुंजवडी व गुणवरे येथे आयोजित लंपी आजाराच्या पार्श्वभूमीवर आयोजित लसीकरण शिबिरास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लंफी रोगाचे 500 जनावरांना लसीकरण करण्यात आले. यासाठी पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ येथील विद्यार्थ्यांनी लसीकरणासाठी विशेष परिश्रम घेऊन सहकार्य केले तसेच खाजगी वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉ. पोदकुले, डॉ.राजमाने, डॉ चव्हाण, डॉ.यशराज येडे, डॉ.सातव, डॉ. ढेंबरे आणि .याशिवाय वाई येथील सरकारी डॉक्टरच्या टीम ने सहकार्य केले. लसीकरणापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांना लसीकरण करून घ्यावे असे आवाहन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ शिल्पा पाटील यांनी केले. जनावरांची लसीकरण मोहिमेसाठी सहकार्य करणाऱ्या सर्व डॉक्टरांचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिल्पा पाटील व डॉक्टर सुरेश गावडे यांनी आभार मानले.