समाज्यातील वंचिता साठी कार्य करण्याची हीच योग्य वेळ : युगेंद्र पवार

पै. सार्थक फौंडेशन चा वर्धापन दिन साजरा
बारामती :
समाजातील प्रत्येक घटकापर्यंत आणि वंचितांपर्यंत आपले सामाजिक कार्य पोहचले पाहिजे त्यासाठी तरुण वयात युवकांनी सामाजिक उत्कृष्ट कार्य करण्याची हीच खरी वेळ असल्याचे प्रतिपादन विद्या प्रतिष्ठान चे  खजिनदार युगेंद्र दादा पवार यांनी केले. 
 पैलवान सार्थक फाउंडेशन यांच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित शालेय विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप व  खाऊचे वाटप  करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून युगेंद्र पवार  बोलत होते. 
 याप्रसंगी बारामती सहकारी बँकेचे चेअरमन सचिन सातव मा. नगरसेवक सत्यव्रत  काळे, नवनाथ बल्लाळ, बारामती तालुका फेडरेशन चे अध्यक्ष  तानाजी कर्चे,  सोमेश्वर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष सिद्धार्थ गीते,  शिवसेना शहराध्यक्ष पै. पप्पू माने, दिनेश जगताप, निलेश तावरे, विजय गावडे, प्रीतम वंजारी,  पप्पू शेरकर, शब्बीर शेख आदी मान्यवर उपस्तित होते. 
 पैलवान सार्थक  फाउंडेशन चे कार्य कौतुकास्पद असून त्यांनी केलेले सामाजिक कार्य खऱ्या अर्थाने वंचितांसाठी आणि शोषितांसाठी महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन योगेंद्र पवार यांनी केले. 
 कार्यक्रमाचे प्रास्तविक पैलवान सार्थक  फाउंडेशन चे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष गणेश आटपडकर  यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी होणेसाठी अमोल कुलट, तात्यासाहेब राणे, सुनील लोणारी,  अवधूत कर्चे,निलेन मगर  अक्षय  कर्चे यांनी विशेष परिश्रम केले. 
 याप्रसंगी बारामती नगर परिषदेच्या शाळा नंबर,पाच,   सहा, सात, आठ,  उर्दू शाळा आणि मिशन हायस्कूल मधील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूचे वाटप करण्यात आले.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!