गृह कर्जे जलद गतीने देण्याचा प्रयत्न : जोगेंद्र पाल सिंह

बारामती : 
ग्राहकांना  विविध कर्ज व सेवा सुविधा   देत असताना या नंतरच्या काळामध्ये जलद गतीने आणि कमी कागदपत्रांमध्ये ग्राहकांना गृह कर्जे  देण्यासाठी प्रयत्नशील असून ग्राहकांच्या प्रत्येक  अडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन  स्टेट बँक ऑफ इंडियाचे महाव्यवस्थापक (नेटवर्क ) जोगेंद्र 
पाल सिंह यांनी केले
शहरातील मुक्ताई लॉन्स या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया च्या वतीने   बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया आणि क्रेडाई या बाधकाम क्षेत्रातील  संस्था च्या सहकार्याने भव्य प्रोपर्टी एक्सपो प्रदर्शन चे आयोजन करण्यात आले होते या वेळी जोगेंद्र पाल सिंह  यांनी मनोगत केले. 
या प्रसंगी  उपमहाव्यवस्थापक मुकेश कुमार सिंह, सहायक महाव्यवस्थापक  पंकज कुमार सिंह, गृहकर्ज विभाग चे सहायक महाव्यवस्थापक अमिताभ श्रीवास्तव, क्रेडाई चे अध्यक्ष सुरेंद्र भोईटे, बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया चे  मा. अध्यक्ष  दीपक काटे व बारामती शाखा मुख्य व्यवस्थापक कृष्णकांत काळे व निखिलकुमार पवार, चंदनकुमार सिंह, शिल्पा खराडे   इतर मान्यवर उपस्तित होते. 
 सर्व  सामान्य चे स्वप्नातील घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एसबीआय नेहमी साह्य करेल,  गृहकर्ज घेत असताना कमी कागतपत्रे व जलद गतीने सेवा देणार असून बाधकाम व्यवसायिक व ग्राहकांना संतुष्ट व समाधानी करणार असल्याचे जोगेंद्र पाल सिंह यांनी सांगितले.
सुरेंद्र भोईटे, दीपक काटे यांनी गृह कर्जे घेत असताना सहकार्य ची अपेक्षा व्यक्त करत बारामती च्या बांधकाम क्षेत्राबद्दल माहिती दिली. 
उपस्तित सर्व वरिष्ठ अधिकारी यांनी गृह कर्जे घेताना जलद गतीने व कमी कागतपत्रात बारामती शाखेत मंजुरी देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
बांधकाम व्यवसायिक यांच्या विविध  स्टॉलवर आपले घर, दुकान, रोहोऊस,बंगला व  मोकळे प्लॉट घेण्यासाठी व चौकशीसाठी  ग्राहकांनी गर्दी केली होती 
बांधकाम व्यवसायिक भूषण ढवाण यांनी बँकेची व ग्राहकांची अपेक्षा याबद्दल माहिती दिली. 
या प्रसंगी तात्काळ 52 ग्राहकांचे गृह कर्ज मंजूर करण्यात आले.
सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी तर आभार प्रदर्शन संदीपकुमार यांनी मानले
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!