गोखळी (प्रतिनिधी) *जगविख्यात साहित्यिक लोकशाहीर आण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याचे लोकार्पण व तैलचित्राचे अनावरण रशिया या देशांमध्ये झाले ही बाब तमाम भारतीयांसाठी आनंदाची, व अभिमानाची आहे म्हणुन गोखळी ग्रामपंचायत मध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुजन करून व सर्वाना पेढे वाटुन रशिया सरकारचे आणी महाराष्ट्र शासनाचे आभार व्यक्त करुन आनंद उत्सव साजरा करण्यात आला त्यावेळी गोखळी गावचे माजी उपसरपंच मा .डाँ.अमित गावडे पोलिस पाटील विकास शिंदे सामाजिक कार्यकर्ते अजित गावडे (पाटिल) लहुजी शक्ती सेना सातारा संपर्कप्रमुख , रामभाऊ पाटोळे लहुजी शक्ती सेना फलटण पु्र्व तालुका अध्यक्ष आकाश बागाव लहुजी शक्ती सेना पंचबिघा अध्यक्ष मा.,रणजित दणाणे खटकेवस्ती अध्यक्ष मा.श्री. निलेशभाऊ बागाव सामाजिक कार्यकर्ते शेखरभैय्या लोंढे विजय गेजगे , गणेश सोनवणे, उत्तम जगताप व लहुजी शक्ती सेनेचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते*