गोखळी (प्रतिनिधी) सहकाररत्न डॉ शिवाजीराव गावडे यांच्या संकल्पनेतून श्रीराम ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था गोखळी व राज ॲग्रो सर्व्हिस तसेच यांचे विद्यमाने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून लंपी आजाराच्या पार्श्वभूमीवर गोखळी आणि पंचक्रोशीतील जनावरांचे मोफत लसीकरण करण्यात. आले . लसीकरण मोहिमेचा शुभारंभ पतसंस्थेचे संचालक रमेश दादा गावडे यांचे हस्ते श्रीफळ फोडून, श्रीराम ग्रामीण सहकारी पतसंस्थे संस्थापक डॉ.शिवाजीराव गावडे ( सवई ) यांचे हस्ते देशी गायीस लस टोचून करण्यात आला. यावेळी फलटण पंचायत समितीचे सह्यायकपशुवैद्यकीय अधिकारी डॉ सुरेश गावडे,गोखळी ग्रामपंचायतीचे उपसरपंच सागर गावडे पाटील, अभिजित जगताप, रमेश दादा गावडे(सवई ) ज्ञानेश्वर घाडगे, अजित धुमाळ,बाबा गावडे, महेश जगताप, राजेंद्र फडतरे, संतोष गावडे, ,ज्यबिलट( बायफ)चे डॉ श्रीनिवास पाटील उपस्थित होते. लसीकरण मोहीम यशस्वीपणे करण्यासाठी श्रीराम ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था व राज ॲग्रो सर्व्हिस सेंटर चे सर्व संचालक आणि डॉ.गणेश गावडे, डॉ.सुरेश किसन गावडे, डॉ.सदिप गावडे, डॉ.हणमत गाढवे, डॉ.सुदाम आटोळे, डॉ.राजकुमार मांढरे, डॉ.मनोहर गावडे, डॉ.वैभव पोदुकले खाजगी पशुवैद्यकीय डॉक्टर्स व ज्युबिलट ( बायफ) टिमचे सहकार्य लाभले. गोखळी, पंचबिघा,लोहालवस्ती, शांतीदासनगर, गवळीनगर आणि खटकेवस्ती, येथे जनावरा मधील *लंपी* (LSD) रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी *लंपी* रोगप्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात आली . या मोहिमेस शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून मोठ्या राबविण्यात आलेल्या लंपी प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिराचे फलटण पंचायत समितीचे पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉक्टर व्ही टी पवार, पशुवैद्यकीय दवाखाना आसू श्रेणी १चे पशुधन विकास अधिकारी डॉ अविराज राजे यांनी श्रीराम पतसंस्था व राज ॲग्रो सर्व्हिस सेंटर चे अभिनंदन केले.फलटण तालुक्याच्या विविध स्तरावरून या लसीकरण मोहिमेचे कौतुक होत आहे या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी समाजातून श्रीराम पतसंस्था व राज ॲग्रो सर्व्हिस सेंटर सारख्या संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे तरच लंपी आजारापासून जनावरांचा बचाव होऊ शकतो असे डॉक्टर पवार यांनी सांगितले.