फलटण: Cikautox India Pvt.Ltd कंपनीच्या वतीने फलटण एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग फलटण या ठिकाणी पूल कॅम्पस ड्राईव्ह चे आयोजन करण्यात आले होते,सदरच्या पूल कॅम्पस ड्राईव्ह साठी Cikautox India Pvt. Ltd. मार्फत विद्यार्थ्यांची मुलाखत घेऊन त्यांची निवड करण्यासाठी स्पेन देशातील मिकेल मेंडिब- कंपनीचे सीईओ, संदीप पाटील- एच आर, निशा भोयार- डेप्युटी मॅनेजर व विशाल उबाळे- ऑपरेशन मॅनेजर हेड मेगा कॉर्पसोल एलएलपी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. दिनांक १६ सप्टेंबर रोजी या मुलाखती घेण्यात आल्या. महाविद्यालयातील व कोल्हापूर, रत्नागिरी, सोलापूर, संगमनेर, सावंतवाडी, सांगोला, सातारा, नाशिक, सोमेश्वर व इंदापूर या ठिकाणावरून एकुण ६७ विद्यार्थ्यांनी यावेळी मुलाखती दिल्या, त्यापैकी २९ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिरुद्ध महात्मे यांनी सांगितले.यावेळी अक्षय अरुण रंगत,
राम धुळाजी ठोंबरे,
मोनाली सोनवलकर,
शुभम दगडू शिंदे,
स्वरूप रामू पाटील,
शिवराम रमाकांत सावंत,
अनिता धनाजी आद्रत,
शिवशरण अनिल हरगेरी,
प्रसाद बळीराम शिंदे,
गणेश राजेश बिडवे,
भावेश काशिनाथ घाडगे,
यश महेंद्र राजे,
अमित रमेश दबडे,
मोहम्मद कैफ सरवर शेख,
हितेश रवींद्र मुसळे,
प्रणव संजय कुलकर्णी,
दिव्या दिपक सुतार,
साक्षी शांतीलाल शिंदे,
नागेश जनार्दन कांबळे,
राहुल प्रकाश घोरपडे,
गायकवाड अनिकेत गणेश,
संतोष रघुनाथ पिसाळ,
सिद्धी किरण कांबळे,
सरतापे अमिषा राजेश,
संकेत अरुण रणदिवे,
वैभव नानासाहेब कदम,
सौरभ संतोष देशमुख,
सुर्यवंशी मेघराज जयराम व
साक्षी चंद्रकांत नाळे या विद्यार्थ्यांची Cikautox India Pvt. Ltd. कंपनीमध्ये निवड झाली त्यासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर विदुर विवेक गुंडगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मुलांचे अभिनंदन केले. फलटण सारख्या ग्रामिण भागातील विद्यार्थी फलटण एज्युकेशन सोसायटीचे काॅलेज आॅफ इंजिनिअरिंग फलटण मधुन उत्तम तंत्रज्ञान अवगत करून तसेच आवश्यक तांत्रिक कौशल्य विकसित करुन आज अत्यंत उत्तम दर्जाचे इंजिनिअर बनुन विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरी करत आहेत तसेच काही विद्यार्थी उद्योजक म्हणून यशस्वी होताना दिसत आहेत. जागतिक दर्जाचे तंत्रशिक्षण आज फलटण मध्येच उपलब्ध असुन याचा फलटण परिसरातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी केले.
निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र विधानपरिषद अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर , फलटण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर , फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी प्रा. अरविंद निकम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिरुद्ध महात्मे, यांनी अभिनंदन केले.