फलटण: फलटण तालुक्यातील फरांदवाडी केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जुनागाव वाठार निंबाळकर येथे गणेश उत्सवानिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा व चित्रकला स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. सदर स्पर्धेचे बक्षीस वितरण आज जुनागाव शाळेत वाठार निंबाळकर गावचे माजी सरपंच श्री.अशोकराव निंबाळकर(आण्णा) यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी गेली पाच वर्षे आई प्रतिष्ठान तालुक्यात, जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबवत असल्याचे आण्णांनी मत व्यक्त केले .
प्रथमतः श्री.विजयकुमार निंबाळकर सर यांनी चांगल्या कार्याबद्दल सौ. सिमा मदने मॅडम व सौ. अर्चना गायकवाड मॅडम यांना रोप देऊन सत्कार केला.तसेच जिल्हा पुरस्कार मिळाल्याबद्दल गणेश तांबे यांचाही रोप देऊन सत्कार करण्यात आला.स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थी टिकला पाहिजे व चमकला पाहिजे या हेतूने देऊर कॉलेज मध्ये कार्यरत असणारे
श्री.विजयकुमार निंबाळकर सर यांनी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्यामधीलच आई प्रतिष्ठान वाठार निंबाळकरच्या सहकार्याने विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
या स्पर्धेमध्ये इयत्ता तिसरी व चौथीच्या गटामध्ये वकृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धा याचे आयोजन करण्यात आले. यामध्ये वकृत्व स्पर्धेमध्ये ईश्वरी संतोष पन्हाळे प्रथम क्रमांक, शिवराज राजेंद्र मुळीक द्वितीय क्रमांक, सानिका सचिन शेळके तृतीय क्रमांक, निबंध स्पर्धेमध्ये शिवकन्या सुरेंद्र भागवत प्रथम क्रमांक, पूर्वी शशिकांत पारखे द्वितीय क्रमांक, रिद्धी बाळकृष्ण निंबाळकर तृतीय क्रमांक.
तसेच इयत्ता दुसरीच्या निबंध व वकृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये निबंध स्पर्धेमध्ये शौर्य अजित निंबाळकर प्रथम क्रमांक, स्वप्नाली दीपक शेळके द्वितीय क्रमांक , ज्ञानेश्वरी महादेव पवार तृतीय क्रमांक. वकृत्व स्पर्धेमध्ये श्रुतिका प्रदीप खलाटे प्रथम क्रमांक, शिवांजली बाळकृष्ण निंबाळकर द्वितीय क्रमांक, आयुष विद्यानंद निंबाळकर तृतीय क्रमांक.
तसेच इयत्ता पहिलीच्या चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या.यामध्ये उत्कर्षा नवनाथ लोखंडे प्रथम क्रमांक, सई नानासो तांबे द्वितीय क्रमांक, रुद्र गणेश मुळीक तृतीय क्रमांक. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना व सहभागी विद्यार्थ्यांना आई प्रतिष्ठान वाठार निंबाळकरकडून गौरविण्यात आले. यामध्ये इयत्ता तिसरी व चौथीच्या गटातील मुलांना सन्मानचिन्ह व पुस्तक देण्यात आले. इयत्ता दुसरीच्या मुलांना सन्मानपत्र व पुस्तक देण्यात आले.तर पहिलीच्या मुलांना पुस्तके भेट देण्यात आली.
यावेळेस आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.गणेश तांबे यांनी आपल्या मनोगतात प्राथमिक शिक्षकांना अनेक शैक्षणिक कामे असतानाही जुनागाव शाळेची गुणवत्ता उल्लेखनीय असल्याचे मत व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांनीही स्पर्धेच्या युगामध्ये टिकण्यासाठी स्वतः परिश्रम घेणे गरजेचे आहे. असे मत व्यक्त केले. तसेच पालकांनीही आपल्या मनोगतामध्ये जुनागाव शाळा व शाळेतील शिक्षकांचे कौतुक केले व विजयकुमार निंबाळकर सर हे विविध उपक्रम राबवत असल्याबद्दल त्यांचे आभार मानले.
या बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी वाठार निंबाळकर गावातील जेष्ठ नागरिक, ग्रामस्थ, पालक , विद्यार्थी वर्ग उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सीमा मदने मॅडम यांनी केले तर आभार सौ.अर्चना गायकवाड मॅडम यांनी मानले.