फलटण: कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला दिनांक 15 सप्टेंबर पासून सुरुवात झाली असून दिनांक 15 ते 25 सप्टेंबर दरम्यान विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करून आवश्यक ती कागदपत्रे संकेतस्थळावर अपलोड करायचे आहेत .कृषी अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय फलटण, जिंती नाका फलटण पुणे रोड येथे उपलब्ध आहे. प्रवेश प्रक्रिविषयीचे सर्व मार्गदर्शन विद्यार्थ्यांना महाविद्यालयामार्फत केले जाईल. श्रीमंत शिवाजीराजे कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चर ची प्रवेश क्षमता 120 विद्यार्थी आणि कृषी महाविद्यालयाची प्रवेश क्षमता 120 विद्यार्थी आहे तरी कृषी पदवीसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात संपर्क साधावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सागर निंबाळकर(9423884887) यांनी केले आहे
संपर्क – प्रा.अमोल रणवरे 9423967567,प्रा.डॉ.गोपीचंद धायगुडे 9766813939