फलटण : मालोजीराजे शेती विद्यालय व कॉलेजची विद्यार्थ्यांचा एमएचटी-सीईटी परीक्षेत महाराष्ट्रात झेंडा,
मालोजीराजे शेती विद्यालय व जुनियर कॉलेज व श्रीमंत मालोजीराजे अभ्यास केंद्रात शिकत असणारे
कुमारी. क्षीरसागर समीक्षा सुनील हिने 99.99% परसेंटाइल गुण मिळाले . ती महाराष्ट्रात मुलींमध्ये प्रथम येण्याचा मान मिळाला. तसेच ओबीसी प्रभागात सुद्धा प्रथम आले. तसेच याच विद्यालयाचा विद्यार्थी कुमार धावडे सौरभ सतीश या मुलाने 99.98 टक्के परसेंटाइल गुण प्राप्त केले व तो NT-C प्रभागात महाराष्ट्रात प्रथम आला. दोन्ही विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रामध्ये आपल्या फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मालोजीराजे शेती विद्यालय कॉलेजचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात उज्वल केले या दोन्ही विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र राज्याचे माजी सभापती व फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेब तसेच फलटण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर व फलटण एजुकेशन सोसायटीचे सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी विद्यार्थी व त्यांना शिकवणारा सर्व स्टाफचे अभिनंदन व कौतुक केले.
प्रशालाचे प्राचार्य श्री ज्ञानदेव कोळकर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक अभिनंदन केले व श्रीमंत संजीवराजे यांनी केलेल्या आव्हानाला आम्ही केलेले प्रयत्न यशस्वी झालो असे गौरव काढले