मुधोजी चे विकास काकडे , सचिन धुमाळ व संजय गोफणे यंदा च्या लायन्स आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी

फलटण दि. १३ ( फलटण टुडे ):
लायन्स क्लब फलटण यांचे वतीने ५ सप्टेंबर डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जन्मदिनी शिक्षक दिन साजरा करण्यात आला. फलटण येथील माळजाई मंदिर येथे आदर्श शिक्षक पुरस्कार व आदर्श पत्रकार पुरस्काराने शिक्षक व पत्रकारांचा गौरव करण्यात आला.
यावेळी फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे विकास काकडे यांना त्याच्या 27 वर्षं सेवा व
.हिंदी व भूगोल विषय अध्यापन
हिंदी विषय तालुकस्तर व जिल्हास्तर तज्ञ मार्गदर्शक हिंदी राष्ट्रभाषा,पुणे..हिंदी प्रचार व प्रसार कार्याबद्दल लायन्स आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले.
तसेच सचिन जगन्नाथ धुमाळ
M.A.B.P.Ed. NIS (Hockey Coach )
फलटण एज्युकेशन सोसायटीमध्ये 2005 पासून क्रीडा शिक्षक व हॉकी क्रीडा मार्गदर्शक म्हणून काम पाहत आहे. सन 2009 साली 17 वर्षाखालील मुलांचा संघ राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. 2010 साली 16वर्षाखालील मुलांचा संघ राज्यात द्वितीय क्रमांक मिळवला.
2011, 2012, 2013 सलग तीन वर्ष महिला हॉकी संघाने राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक. सन 2016 ,2017, 2018 सलग तीन वर्ष 17वर्षाखालील नेहरू संघाने राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन तृतीय क्रमांक मिळवला. 2005 ते 2021 दरम्यान 60/70 मुले व मुली राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आहे.
2005 ते 2021 दरम्यान 100 खेळाडूंनी राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवून पदक प्राप्त केले.
जिल्हा विभाग व राज्यस्तरीय हॉकी स्पर्धांचे यशस्वीरित्या आयोजन.
4 राष्ट्रीय खोखो स्पर्धांचे यशस्वीरित्या आयोजन. यांच्याक्रीडा क्षेत्रातील कार्यकर्ता यंदाचा लायन्सचा क्रीडा क्षेत्रातील आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला .
संजय गोफणेयांना त्यांच्या पंधरा वर्षाच्या उत्कृष्ट अध्यापन कार्याबद्दल तसेच बाह्य परीक्षेतील उत्कृष्ट कार्याबद्दल यंदाचा लायन्स चा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले .
या प्रसंगी प्रमुख पाहुणे फलटण.एज्युकेशन सोसायटी फलटण चे प्रशासनअधिकारी अरविंद निकम ,
जेष्ठ पत्रकार अरविंद भाई मेहता , लायन्स भोजराज नाईक निंबाळकर ,
लायन्स चे अध्यक्ष विजयकुमार लोंढें-पाटील , लायन्स चे खजिनदार प्रतापसिंह (दादा ) निंबाळकर व
आदर्श शिक्षक पुरस्कार स्वीकारणारे प्राथमिक १५ शिक्षक व ६ माध्यमिक च्या शिक्षकांना पुरस्कार देण्यात आले . इतर कोणत्याही नोकरीतील सेवे पेक्षा शिक्षकां कडून होणारी समाजसेवा ही सर्वश्रेष्ठ सेवा व निस्वार्थ पणे केलेली महान सेवा आहे असे. फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासनाधिकारी अरविंद निकम यांनी प्रतिपादन केले. तसेच
विद्यार्थ्यांना ज्ञानग्रहण करताना व्यवसायिक शिक्षण घेऊन स्वयं-रोजगार निर्माण करणारे शिक्षण मिळावे असे दैनिक ऐक्य चे जेष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांनी आपल्या भाषणात सांगितले .


यावेळी फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूलव जुनिअर कॉलेज फलटण मधील काकडे , धुमाळ व गोफणे यांच्या या सन्मानाबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य विधान परिषद सभापती मा. नामदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर , फलटण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष तथा फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर , यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले


या प्रसंगी प्रमुख पाहुणे फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण चे प्रशासनअधिकारी अरविंद निकम ,
जेष्ठ पत्रकार अरविंद भाई मेहता , लायन्स भोजराज नाईक निंबाळकर ,
लायन्स चे अध्यक्ष विजयकुमार लोंढें-पाटील , लायन्स चे खजिनदार प्रतापसिंह (दादा ) निंबाळकर व
आदर्श शिक्षक पुरस्कार स्वीकारणारे प्राथमिक व माध्यमिक चे शिक्षक व इतर मान्यवर उपस्थित होते .

या सन्मानाबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज चे प्राचार्य बाबासाहेब गंगवणे व मुधोजी हायस्कूल जुनियर कॉलेजचे उपप्राचार्य एम के फडतरे तसेच माध्यमिकचे उपप्राचार्य ए वाय ननावरे व सकाळ विभागाचे पर्यावेक्षक शिवाजीराव काळे यांनी काकडे , धुमाळ व गोफणे यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले .


काकडे , धुमाळ व गोफणे यांना लायनचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्या बद्दल त्यांचे अभिनंदन करताना मुधोजीहायस्कूलचे प्राचार्य बाबासाहेब गंगावणे मुधोजी हायस्कूल जुनियर कॉलेजचे उपप्राचार्य एम. के . फडतरेसकाळ विभागाचे पर्यवेक्षक शिवाजीराव काळे व इतर मान्यवर
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!