बारामती: ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानाने भोपाळ येथे होणाऱ्या युथ राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धे साठी बारामतीच्या भक्ती तानाजी गावडे हिची निवड झालेली आहे. सदर स्पर्धा भोपाळ येथे 17 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर2022 या दरम्यान होणार असून या स्पर्धेमधून युथ एशियन गेम साठी भारतीय संघाची निवड करण्यात येणार आहे. या स्पर्धेकरिता भक्तीची निवड झालेली आहे तिला N.I.S प्रशिक्षक श्री. प्रसाद रणवरे सर यांचे मार्गदर्शन लाभले.