बारामती मध्ये विमा प्रतिनिधी चे आंदोलन

बारामती :
देशातील सर्वात मोठ्या भारतीय जीवन विमा महामंडळाच्या नव्या धोरणामुळे विमा प्रतिनिधींसमोर
अनेक समस्या उभ्या टाकत असून त्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय जीवन विमा महामंडळ विमा
प्रतिनिधी पश्चिम विभाग संघटनेने आंदोलनाची हाक दिली आहे.
त्यानुसार बारामती  शहर आणि जिल्ह्यातील एका ही विमा कार्यालयात प्रतिनिधींनी विमा विषयक एकही काम न करता
आंदोलन यशस्वी केले. विमा प्रतिनिधीच्या कमिशन मध्ये कपात करू नये, सर्व विमा प्रतिनिधींना समूह आरोग्य विमा योजना लागू करावी, विमा प्रतिनिधींना अंशदायी भविष्य निर्वाह निधी लागू करावा, विमा प्रतिनिधींना अंशदायी पेन्शन लागू करावी, विमा प्रतिनिधींच्या टर्म विमा वाढवून द्यावा, विमा प्रतिनिधींच्या क्लब नियम व अॅडवान्स योजनेत दुरुस्ती करावी, मुलांना शिक्षण कर्ज उपलब्ध करावे, क्लब सदस्यांसाठी गृह कर्ज ५ टक्क्यांनी द्यावे, विमा प्रतिनिधींच्या परिवारासाठी कल्याण निधी तयार करावा, विमा प्रतिनिधींना सरकारने व्यावसायिक दर्जा द्यावा आदी मागण्यांबाबत केंद्र सरकार व भारतीय जीवन विमा महामंडळाच्या व्यवस्थापनाकडे पाठपुरावा करुनही दाद न दिल्याने अखिल भारतीय स्तरावर विमा प्रतिनिधींनी आंदोलन पुकारले आहे, पॉलिसीधारकांच्या बोनसमध्ये वाढ करावी,पॉलिसी कर्ज व अन्य वित्तीय व्यवहारावरील व्याजात कपात करावी, विमाधारकांना चांगली पु सेवा द्यावी, ५ वर्षांवरील पॉलिसी पुन्हा सुरु करण्याची मुभा द्यावी, पॉलीसीधारकांनी न दिलेल्या रकमेस सामाजिक सुरक्षा योजनेत हस्तांतर करु नये, एकाच पॉलिसीधारकाच्या वारंवार व्यवहार करण्यासाठी केवायसी दस्तावेज बंधनकारक करु नये, विमा पॉलिसीवरील जीएसटी माफ करावा, विमा प्रतिनिधींच्या गॅच्युईटीची रक्कम २० लाखापर्यंत वाढवावी आदी मागण्या करण्यात आल्या. या प्रसंगी विमा प्रतिनिधी 
गोरखराव तावरे,राजन कळंत्रे, महेंद्र खटके,नामदेवराव सोनवणे,सुनिल शिंदे,सागर शेकडे,राजेंद्र सपकळ, खरात  उपस्थित होते 
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!