शिक्षक दिनानिमित्त व दहीहंडी संघाच्या १५ वर्ष यशस्वी वाटचाली निमित्त बारामती शहरांमधील खंडोबा नगर येथील
कै. संदीप (भाऊ) पवार दहीहंडी संघाने खंडोबा नगर येथील जिल्हा प्राथमिक शाळा ढवाण वस्ती येथे शाळेच्या आवारात सीसी टीव्ही कॅमेरे आणि शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शालेय वस्तू व खाऊ वाटप करून एक सामाजिक उपक्रम साजरा करण्यात आला तसेच खंडोबा नगर दत्त मंदिर येथील ज्ञानेश्वरी आध्यात्मिक शिक्षण संस्था येथे अनाथ व गरजू विद्यार्थ्यांना वर्षभर पुरेल इतके 600 किलो धान्य (गहू, तांदूळ) देण्यात आले व ,दत्त मंदिर , ढवाण वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि एकता इंग्लिश मीडियम स्कूल येथे भिंतीवरील घड्याळे देण्यात आले
याप्रसंगी परवेज सय्यद , गणेश जोजारे, दिलीप ढवाण पाटील, जोरी सर व सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होते,
मंडळाचे अध्यक्ष :-आनंद लोंढे, संतोष गायकवाड, मयूर शिंदे, प्रदीप पवार, बलभीम जाधव, किरण भागवत, सागर रणदिवे, राहुल चव्हाण पाटील, दादा भोसले, अक्षय लोंढे, चेतन लोंढे, रोहित तारू, मयूर गलांडे, शुभम वाघमारे, मोनु दामोदरे, सागर रोहानी आदी उपस्तित होते.
फोटो ओळ : जिल्हा परिषद शाळेस मदत देताना दहीहंडी संघाचे पदाधिकारी