बारामती :
वटसावित्री ची पूजा दाखविताना पर्यावरण पूर्वक देखावा साजरा करून सद्याच्या काळात पर्यावरण किती महत्वाचे आहे उदाहरण गौराईच्या देखाव्यातून प्रगट होत असल्याबद्दल बारामती च्या सौ श्रद्धा निखिल थोरवे प्रिया उबाळे कुमारी सायली उबाळे मीनाताई वाहळ यांचे कौतुक होत आहे.
जामदार रोड , कसबा बारामती येथील सौ.सावित्री दिलीप उबाळे यांनी केलेली यांच्या संकल्पनेतून गौराई समोर केलेली वटसावित्रीची आरास वैशिष्टये पूर्ण दिसत असल्याने परिसरातील महिलांनी सदर देखावा पाहण्यास गर्दी केली होती.
झाडे लावा झाडे जगवा व मुलगी वाचवा मुलगी शिकवा हा संदेश या वर्षीच्या गणेशउत्सव व गौराई च्या आगमनानिमित्त देण्यात येत असल्याचे सौ श्रद्धा निखिल थोरवे प्रिया उबाळे कुमारी सायली उबाळे मीनाताई वाहळ यांनी सांगितले
गौराई निमीत्त हळ्द कुंकू च्या कार्यक्रमा निमीत्त प्रत्येक महिलेस रोपटे देऊन सन्मानित करण्यात आले