रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शाहू हायस्कूल व ज्युनियर बारामती येथे भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा 5 सप्टेंबर हा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्याचे पूजन करून करण्यात आले तसेच मा. मुख्याध्यापक बी. एन .पवार साहेब मा. उप मुख्याध्यापक पी. एन. तरंगे, पर्यवेक्षक श्री बी ए सुतार सर तसेच इतर सर्व मान्यवर यांच्या उपस्थिती माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले करण्यात आले
इयत्ता दहावी ब च्या विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षक बंधू भगिनींचे गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात केले. याप्रसंगी विद्यालयातील प्राथमिक विभाग मधील ईश्वरी नेवसे हिने शिक्षकांविषयी आपले मत मांडले तसेच आरती ढोरे ,सानिया शेख, क्षितिजा कड, समृद्धी आटोळे यांनी शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडून आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन मिळतो आपले मत व्यक्त केले
अध्यक्षीय भाषणात मा. मुख्याध्यापक श्री बी. एन. पवार साहेब यांनी आजची आधुनिक पिढी आणि शिक्षक यामध्ये होणारा बदल तसेच शिक्षक आणि विद्यार्थी यांमधील संबंध याविषयी चा दृष्टिकोन व्यक्त केला
कार्यक्रमाचे आयोजन डी.एम. राजगुडे व एस.टी. राऊत यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री एस. एम. जाधव सर सूत्रसंचालन रेवती भागवत या विद्यार्थीनीने केले तर कार्यक्रमाचे आभार श्री एस.टी. राऊत यांनी मानले.