राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत प्रणव शिंदे उपविजेता

बारामती :
औरंगाबाद येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेमध्ये बारामतीचा प्रणव शिंदे उपविजेता ठरला. 19 वर्षाखालील वयोगटामध्ये प्रणव ने हे यश संपादन केले. पुणे जिल्हा संघाकडून खेळत असलेला प्रणव हा बारामतीचा असून बारामतीतील एखाद्या बॅडमिंटन खेळाडूने प्रथमच एवढे मोठे यश संपादन केले आहे. या यशाबद्दल विरोधी पक्ष नेते मा. अजितदादा पवार सो यांच्या हस्ते प्रणवचा सत्कार करण्यात आला. यावेळी दादांनी आपण बारामती मध्ये क्रीडा क्षेत्रासाठी अनेक सोयी सुविधा निर्माण केल्या असून या सुविधांचा लाभ घेऊन जर प्रणव सारखे गुणी खेळाडू निर्माण होत असतील तर निश्चितच मला आनंद वाटेल असे दादांनी आपल्या मनोगतात सांगितले.
प्रणवच्या यशाबद्दल बारामती बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष विवेक पंचनदीकर , हनुमंतराव पाटील , डॉ. संजय पुरंदरे , पुरुषोत्तम खोमणे ,  संजय संघवी,  सुनील पोटे , अविनाश लगड , डॉ. जितेंद्र आटोळे , विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या जोसेफ मॅडम ,  महेश चावले,  गणेश सपकाळ आदी मान्यवर उपस्तित होते. 
फोटो ओळ :प्रणव शिंदे यांचा सत्कार करताना मान्यवर
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!