विद्या प्रतिष्ठानमध्ये टेकफेस्ट २०२२ चे यशस्वी आयोजन

बारामती :
विद्याप्रतिष्ठान संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या टेकफेस्ट २०२२ (प्रोजेक्ट कॉम्पिटिशन) स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 
यास्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना STEM (Science, Technology, Engineering, Mathematics) या विषय क्षेत्रातील प्रोजेक्ट बनविणे आवश्यक होते. त्याची तयारी विद्यार्थी गेल्या महिनाभर करत होते. या स्पर्धेच्या पहिल्या फेरीसाठी विद्याप्रतिष्ठान संस्थेच्या १५ शाळांतील १००० पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी काही निवडक दर्जेदार प्रोजेक्ट अंतिम फेरीमध्ये सहभागी होण्यासाठी निवडण्यात आले होते. 
विद्या प्रतिष्ठानचे डॉ. सायरस पुनावाला स्कूल मध्ये दिनांक ३० ऑगस्ट २०२२ रोजी आयोजित करण्यात आलेल्या टेकफेस्ट २०२२ च्या अंतिम फेरीमध्ये ३२५ विद्यार्थ्यांनी १२६ प्रोजेक्ट्स सादर केले. कार्यक्रमाचे उदघाटन विद्या प्रतिष्ठानचे इंग्लिश मिडीयम स्कूल बारामतीच्या प्राचार्या सौ. राधिका कोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रोजेक्ट कॉम्पिटिशनमध्ये विद्यार्थ्यांनी प्रोजेक्ट्स, संकल्पना, वापरलेले तंत्रज्ञान इत्यादी विषयी माहिती परीक्षकांना आणि प्रोजेक्ट पाहायला आलेल्या पाहुण्यांना दिली. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉ. निर्मलकुमार साहूजी, डॉ. लालासाहेब काशीद, डॉ. अनिल डिसले, डॉ. चैतन्य कुलकर्णी, डॉ. नीलिमा पेंढारकर, डॉ. तुषार बोरसे, डॉ. विपीन गावंडे यांनी उपस्थिती दर्शविली. 
कार्यक्रमाच्या बक्षीस समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविले. कार्यक्रमाचे पाहुणे व परीक्षक डॉ. साहूजी यांनी विद्यार्थ्यांमधून विजेत्यांची निवड करताना कोणते निकष वापरले याची माहिती दिली, तसेच या प्रोजेक्टचे भविष्य काळात पेटंट घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित केले.
इयत्ता ७वी ते ८वी या गटात विद्याप्रतिष्ठान संस्थेच्या नांदेड सिटी पब्लिक स्कूलचे लक्ष सोनावणे, एल्विन ऍंथोनी यांना प्रथम, मगरपट्टा सिटी पब्लिक स्कूलचे नील कारखानीस आणि तन्वी   गाडे यांस द्वितीय,  डॉ. सायरस पुनावाला स्कूलचे साईराज रसाळ, वेदांत जाधव, तिर्थेश धुमाळ यांस तृतीय, तसेच विनोदकुमार गुजर बालविकास मंदिरची विद्यार्थिनी रितिका शाह हिला उत्तेजनार्थ क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. 
इयत्ता ९वी ते १०वी गटात मगरपट्टा सिटी पब्लिक स्कूलचे साधक शिंदे, आस्था सातव, आदित्य पटेल यांना प्रथम, नांदेड सिटी पब्लिक स्कूलचे सान्वी बनसोडे, नेत्र प्रकाश यांना द्वितीय, इंग्लिश मिडीयम स्कूल बारामतीचे प्रीती पाटील, सांची शाह, आदिती बोराडे यांस तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. 
इयत्ता ११वी ते १२वी गटात आर्टस्,सायन्स अँड कॉमर्स कॉलेज बारामतीचे दिशा शेट्टी, सानिया निबंधे, तनुजा मासाळ यांना प्रथम व कृष्णा शिंदे यास तृतीय आणि सोमेश्वर इंग्लिश मिडीयम अँड जुनिअर कॉलेजचे समिधा दरेकर, नेहा शितोळे, जागृती निंबाळकर यांना द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. 
टेकफेस्ट २०२२चे आयोजन करण्यासाठी संस्थेचे ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर विशाल कोरे, आर्किटेक्ट धनंजय देशपांडे, अ‍ॅड. डॉ. अतुल शहाणे यांनी मोलाची कामगिरी बजावली. 
विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या विश्वस्थ सौ. सुनेत्राताई पवार, उपाध्यक्ष अ‍ॅड. अशोक प्रभुणे, सेक्रेटरी अ‍ॅड. नीलिमाताई गुजर, खजिनदार युगेंद्रदादा पवार, डॉ. राजीव शाह, किरणदादा गुजर आणि कार्यकारी समितीचे सर्व सदस्य तसेच रजिस्ट्रार कर्नल श्रीश कंबोज यांनी विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मेहनतीबद्दल त्यांचे कौतुक केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!