फलटण प्रतिनिधी ( फलटण टुडे ):-
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत सर्व लाभार्थी दि. 31/8/2022 पुर्वी ई – केवायसी करुन घ्यावी असे अवाहन तहसिलदार समीर यादव यांनी केले आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत सर्व लाभार्थी यांनी ई – केवायसी करणे अत्यंत बंधनकारक आहे. त्यासाठी ई – केवायसी करणेपूर्वी सर्व लाभार्थी यांनी आधारकार्डला मोबाईल नंबर सलग्न करणे आवश्यक आहे. त्या शिवाय ई – केवायसी करता येणार नाही. तरी सर्व लाभार्थी यांनी दि. 31/8/2022 पुर्वी नजिकचे सी एस सी केंद्रावर जाऊन अथवा स्वताचे मोबाईलमध्ये पीएम किसान अॅपवर मुदतीत ई – केवायसी करुन घ्यावी. सीएससी केंद्रावर जाताना आपले आधार कार्डची झेरॉक्स प्रत घेवुन जावे. ई – केवायसी करणेची अतिंम तारीख 31/8/2022 पर्यंत आहे. तदनंतर ई – केवायसी करणेचे राहिल्यास संबंधित लाभार्थी यांचे खातेमध्ये पीएम किसान निधी जमा होणार नाही याची नोंद घ्यावी. त्यामुळे सर्व लाभार्थी यांनी दि . 31/8/2022 पर्यंत ई – केवायसी करावी, असे अवाहन तहसिलदार समीर यादव यांनी केले आहे.