संतोष जाधव सर यांची व्हा.चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल सत्कार प्रसंगी क्रांतीस्मृती डी.एड कॉलेज ग्रुपचे सदस्य
फलटण दि. २८ : (फलटण टुडे )
श्रीमंत मालोजीराजे कायम सेवकांची शिक्षक पतसंस्थेच्या निवडी नुकत्याच जाहीर झाल्या यामध्ये श्री. संतोष जाधव सर यांची व्हा.चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल क्रांतीस्मृती डी.एड कॉलेज ग्रुपच्या वतीने त्यांचा सत्कार सोहळा आज करण्यात आला. त्यांची निवड झाल्याबद्दल श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, इ.सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.यावेळेस प्रस्ताविका मध्ये बोलताना श्री. गणेश तांबे यांनी संतोष जाधव सर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व असून ते सर्वांच्या मदतीला धावून जाणारे व्यक्तिमत्व असून त्यांच्या प्रामाणिक कार्याची दखल घेऊन त्यांची निवड झाल्याची दिसून येते.
क्रांतीस्मृती कनिष्ठ अध्यापक महाविद्यालय सन 2001 ते 2003 च्या बॅचमधील ज्यांनी ज्यांनी उत्कृष्ट कार्य केलेले आहे. यांचा सत्कार दरवर्षी केला जातो. या पाठीमागे ही अनेक सत्कार या ठिकाणी झालेले आहेत. आज श्री. संतोष जाधव सर यांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जंगलवाडी तालुका पाटणचे उपशिक्षक श्री.सचिन भोंडवे सर यांना आई प्रतिष्ठान वाठार निंबाळकरचा या वर्षीचा आई सन्मान पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार क्रांतीस्मृती बॅचच्यावतीने आज करण्यात आला. हा सत्कार सोहळा पद्मावती मंदिर ठाकूरकी फलटण येथे निसर्गरम्य परिसरात संपन्न झाला . या कार्यक्रमाप्रसंगी गणेश तांबे,जीवन सावंत,बिभीषण धोत्रे , संदीप कोळेकर, संजय गोफणे,महेश सूळ,सचिन भोंगळे,राजेंद्र सरक,
नवनाथ काशीद,बबन खाडे,दत्ता खाडे,महेश जाधव इत्यादी शिक्षकांची मनोगते झाली. संतोष जाधव सर यांनी आपल्या मनोगतात प्रत्येक माणसाला एकदाच आयुष्य मिळते आणि त्या आयुष्याचं सोनं करणे हे आपल्या हातात असते. त्यामुळे प्रत्येकाने जास्तीत जास्त इतरांच्या सुखासाठी प्रयत्न केला पाहिजे असे मत व्यक्त केले. दुसरे सत्कारमूर्ती सचिन भोंडवे सर यांनी आपण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन आज उत्कृष्टरित्या सर्वजण कार्य करत असून आगामी काळातील आपण जास्तीत जास्त कार्यरत राहू असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश सुळ यांनी केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.गणेश तांबे यांनी केले व आभार श्री.संजय गोफणे सर यांनी मानले.