ध्यानचंद यांनी हॉकी च्या माध्यमातून भारत देशाला मान , सन्मान , प्रतिष्ठा मिळवून देण्याचे महान कार्य केले : आमदार दिपकराव चव्हाण

 उद्घाटन प्रसंगी आमदार मा. दिपकराव चव्हाण , जगन्नाथ धुमाळ, उमेश बडवे, महेश खुटाळे,शिवाजीराव काळे , पंकज पवार , महेंद्र जाधव , बाहुबली शहा बंडू खुरंगे , प्रविण गाडे व इतर मान्यवर

फलटण दि. २८ (फलटण टुडे ) :
मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी व राष्ट्रीय क्रिडा दिनानिमित्त
फलटण एज्युकेशन सोसायटी व फलटण क्रिडा मंडळ, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने निमंत्रित भव्य हॉकी स्पर्धा (ओपन) २०२२ – २०२३ चे आयोजन दि. २८ व २९ ऑगस्ट २०२२ रोजी मा. आमदार विजयसिंह उर्फ शिवाजीराजे नाईक निंबाळकर क्रिडा संकुल, फलटण येथे आयोजित केल्या गेल्या आहेत . या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन फलटण कोरेगाव मतदार संघाचे आमदार मा.  दीपकराव चव्हाण यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

याप्रसंगी बोलताना आमदार दीपक राव चव्हाण म्हणाले .मेजर ध्यानचंद यांनी हॉकी च्या माध्यमातून भारत देशाला मान , सन्मान , प्रतिष्ठा मिळवून देण्याचे महान कार्य केले . आहे .अशा व्यक्तीच्या जन्मदिनी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करणे ही फार गौरवाची गोष्ट आहे . मेजर ध्यानचंद यांचे स्मरण आजच्या जन्मदिनापूर्ते न ठेवता ते कायम स्मरणात ठेवले गेले पाहिजे व अशा प्रसंगी स्पर्धांचे आयोजन सगळीकडे केले गेले पाहिजे. यामुळे युवा खेळाडूंचे कौशल्य व त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचे काम अशाच स्पर्धा करत असतात .
अशा स्पर्धा आयोजन केल्यामुळे युवा खेळाडूंना एक प्रकारचे व्यासपीठ मिळते त्यामूळे  खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करण्याची संधी उपलब्ध होते.  त्यामुळे अशा स्पर्धांना प्रोत्साहन देणे फार गरजेचे आहे. आजच्या काळामध्ये  सगळीकडे क्रिकेटच वेड आहे पण त्यातूनही इतर खेळांना आपण प्राधान्य दिले पाहिजे. फलटणकरांनी हॉकी , खो-खो  या खेळांच्या स्पर्धेचे वेळोवेळी नियोजन करून महाराष्ट्र तसेच देशभर आपला वेगळा ठसा उमटवला  आहे. व फलटणनेही हॉकी चे चार आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार करून देशभर आपला नावलौकिक मिळवलेला आहे. अशा स्पर्धांचे आयोजन करून खेळाच्या परंपरा आपण टिकवली पाहिजे व युवा खेळाडूंना खेळाकडे आकर्षित करण्याचे काम या स्पर्धेच्या माध्यमातून केले गेले पाहिजे. सचिन लाळगे व सचिन धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या टीमने केलेले स्पर्धेचे नियोजन उल्लेखनीय आहे  असे प्रतिपादन आमदार दीपक चव्हाण यांनी केले .

या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी जेष्ठ हॉकी प्रशिक्षक जगन्नाथ धुमाळ , माजी जिल्हा क्रीडा अधिकारी व ज्येष्ठ हॉकी मार्गदर्शक  उमेश बडवे ,फलटण तालुका क्रीडा अधिकारी महेश खुटाळे ,प्रसिद्ध आर्किटेक्चर महेंद्र जाधव , मुधोजी हायस्कूल चे पर्यवेक्षक शिवाजीराव काळे , जेष्ठ खेळाडू डॉ. दीपक शेंडे , फलटण काँग्रेस शहर अध्यक्ष व हॉकी मार्गदर्शक पंकज पवार , क्रीडा प्रशिक्षक बी. बी. खुरंगे , श्रीमंत रामराजे युवा मंच चे संस्थापक अध्यक्ष व खो-खो खेळाडू राहुल निंबाळकर , राष्ट्रीय हॉकी पंच नटराज क्षिरसागर , ज्ञानेश्वर (पिंटू ) गायकवाड , लोणंद पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व हॉकी खेळाडू अतुल कुंभार , युवा उद्योजक व हॉकी खेळाडू गणेश शिरतोडे , फलटण टुडे चे संपादक व फुटबॉल  खेळाडू अमोल नाळे , उपळवे सोसायटीचे चेअरमन प्रदीप लंबाते , फलटण टुडे चे कार्यकारी संपादक व हॉकी खेळाडू प्रवीण काकडे , ज्येष्ठ खेळाडू अनिल वेलणकर , प्रवीण गाडे , स्वप्निल कांबळे , डॉ. सुहास म्हेत्रे , महेश बोराटे , सुहास ढेकळे , पुणे संघाचे प्रशिक्षक विक्रांत घाडगे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धा पार पाडण्यासाठी  फलटण क्रीडा मंडळ फलटण चे  सुरज जाधव , आय्याज शेख , संदीप ढेंबरे , दत्तात्रय जाधव , गणेश पवार , यश खूरंगे , विक्रम ननावरे, राहुल लोखंडे इत्यादीनी मेहनत घेतली . 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक तायप्पा शेंडगे  तर प्रास्ताविक हॉकी क्रीडा मार्गदर्शक सचिन धुमाळ यांनी केले व आभार हॉकी चे मार्गदर्शक सचिन लाळगे यांनी केले .

श्रीफळ वाढवून स्पर्धेचे उद्घाटन करताना आमदार मा. दीपकरावजी चव्हाण व इतर मान्यवर

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!