फलटण दि. २६ ( फलटण टुडे ) :
फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण च्या ७१ व्या वर्धापन दिन ( मुधोजी दिन ) चे औचित्य साधून या दिवशी फलटण एज्युकेशन सोसायटीमध्ये गेल्या वर्षभरामध्ये सेवानिवृत्त झालेले कर्मचारी तसेच उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या व्यक्तींना , विद्यार्थी , खेळाडू तसेच संस्थेतील इतर शाखांमधील कर्मचारी आणि ज्या शाळांचा निकाल १० वी व १२ वी चा १०० % लागला आहे त्या शाळांच्या प्राचार्यां चा यावेळी सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात येतो.
गेली 2 वर्षात कोरोना महामारीमुळे वर्धापन दिन झाला नसल्याने सन २०१९-२०,२०२०-२१,२०२१-२२ चे पुरस्कार दिले गेले नव्हते. त्यामुळे यंदाच्या वर्षी हे तिन्ही वर्षाचे पुरस्कार देण्यात आले. त्यामध्ये मधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण ने शैक्षणिक वर्ष २०१९-२०,२०२०-२१,२०२१-२२ सलग तीन वर्ष १००% निकालाची परंपरा आबाधीत ठेवल्या मुळे फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण च्या ७१ व्या वर्धापन दिन (मुधोजी दिन ) निमित्त हा पुरस्कार प्रमुख पाहुणे चेअरमन,रयत शिक्षण संस्था, सातारा मा. डॉ.श्री.अनिल पाटील, सेक्रेटरी, फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटण तथा मा. जिल्हा परिषद अध्यक्ष सतारा मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर याच्या शुभहस्ते मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलज च्या वतीने मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलज चे प्राचार्य मा. बाबासाहेब गंगवणे यांनी तो सन्मान स्विकारला.
यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते पंचायत समिती मा. सभाती मा. श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर , मा. प्राचार्य विश्वासराव देशमुख , उपाध्यक्ष फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण मा. रमणलाल दोशी , गव्हर्निंग कौन्सिल सदस्य , फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण मा. हेमंत रानडे , गव्हर्निंग कौन्सिल सदस्य , फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण मा. शिवाजीराव घोरपडे , गव्हर्निंग कौन्सिल सदस्य , फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण मा. शरदराव रणवरे , प्रशासनअधिकारी मा. अरविंद निकम , गव्हर्निंग कौन्सिल सदस्य फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण मा. नितीनशेठ दोशी ,आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू कु.अक्षदा ढेकळे , गुणवंत विद्यार्थी , खेळाडू , शिक्षक वृंद इत्यादी मान्यवर उपस्थित होते