शंकर मार्केटच्या दहिहंडी स्पर्धेतील विजेत्या जय मल्हार गोविंद दहिहंडी पथकाला चषक व रोख पारितोषिक देऊन सन्मानित करताना श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर. सोबत किशोरसिंह नाईक निंबाळकर, , पांडुरंग गुंजवटे, तुषार नाईक निंबाळकर , तेजसिंह भोसले व मान्यवर.
6 थरांचा मनोरा रचून शंकर मार्केट येथील दहिहंडी फोडताना गुणवंडी (बारामती) येथील जय मल्हार गोविंदा पथक.
फलटण (फलटण टुडे ):
शंकर मार्केट दहिहंडी उत्सव समिती व राजे ग्रुप, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दहिहंडी स्पर्धेत चित्तथरारक सहा मनोरे रचत दहिहंडी फोडण्याचा मान गुणवडी (ता.बारामती) येथील जय मल्हार गोविंदा पथकाने मिळवला. विजेत्या गोविंदा पथकाला पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते गौरवण्यात आले.
प्रारंभी स्पर्धेचा शुभारंभ श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शंकर मार्केट दहिवडी उत्सव समितीचे अध्यक्ष किशोरसिंह नाईक निंबाळकर होते. यावेळी फलटणचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे, माजी उपनगराध्यक्ष नितीन भोसले, माजी नगरसेवक बाळासाहेब मेटकरी, सनी अहिवळे, सौ.प्रगती कापसे, सौ.दिपाली निंबाळकर, सौ.वैशाली चोरमले, सौ.अमृता नाईक निंबाळकर, श्री सद्गुरु पतसंस्थेचे चेअरमन तेजसिंह भोसले, महात्मा शिक्षण संस्थेचे प्रमुख दादासाहेब चोरमले, श्रीराम सहकारी साखर कारखाना संचालक महादेव माने, उत्सव समितीचे मार्गदर्शक भाऊ कापसे, निजामभाई आतार, किशोर उर्फ गुड्डू पवार, उद्योजक तुषार नाईक निंबाळकर, रामराजे युवा मंचचे अध्यक्ष राहुल निंबाळकर, रामभाऊ पवार, तेली समाजाचे अध्यक्ष विशाल तेली, योगेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्पर्धेतील विजेत्या जय मल्हार गोविंदा दहिहंडी पथकाला (गुणवडी, बारामती) श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांचे हस्ते रोख पारितोषिक व चषक प्रदान करण्यात आले.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत शंकर मार्केट दहिहंडी उत्सव समितीच्या सदस्यांनी केले.
सदर दहिहंडी स्पर्धेचे यशस्वी आयोजन मंडळाचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक किशोरसिंह (भैय्या) नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्त्वाखाली संतोष कर्वे, आकाश इंगळे, संतोष हिरणवाळे, रोहित शिंदे, गोरख पवार, सनी पवार, अभिषेक कुमटेकर, मुबीन ईनामदार, गोटू जानकर, योगेश हिरणवाळे, निलेश पालकर, मयूर हिरणवाळे, मफी यादव, हरीश कर्वे, अभी पवार, अशितोष केंजळे, दिलीप चवंडके, विश्वराज गांधी, विशाल खानविलकर, गणेश कर्वे, नंतजीत हिरणवाळे, अझहर शेख, अथर्व ढवळीकर, मुन्ना कदम, धनु गवळी, मनोदिप पवार, भुषण पवार, रजत मांढरे, आकाश पवार, भूषण कापसे, इंद्रजीत घाडगे, उत्कर्ष कदम, पंकज जांभळकर, सूरज कारंडे, तुषार हिरणवाळे, ओम हिरणवाळे, कुणाल गवळी, रोहित कापसे, उदय पवार यांनी केले.
यावेळी शामराव कापसे, महेश (गोटु) सुतार, अनिल वेलणकर, जयंत सहस्त्रबुद्धे, आबा पवार, शंतनु रुद्रभटे, शंकर मार्केट शिवजयंती उत्सव मंडळाचे सर्व कार्यकर्ते यांच्यासह शहरातील विविध मंडळांचे कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद रणवरे यांनी केले.
Post Views: 60