वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य आयोजित,राज्यस्तरीय वाचनयात्री पुरस्कार 2022 वितरण समारंभ रविवार दि.21 ऑगस्ट 2022 रोजी बारामती या ठिकाणी अतिशय उत्साहात संपन्न झाला असून श्री.मनोज अग्रवाल (औरंगाबाद) व श्री.राजू गरमडे (चंद्रपूर) यांना हा पुरस्कार मा. श्री. माधव जोशी यांच्या शुभहस्ते देऊन गौरवण्यात आले. 100 पुस्तकांचे वाचन करून त्या पुस्तकाचे समीक्षण केल्याबद्दल व वाचनसंस्कृती वाढवल्याबद्दल हा पुरस्कार दिला जात असतो. कार्यक्रमाचे प्रस्ताविक समूहाच्या संयोजिका श्रीमती.प्रतिभाताई लोखंडे यांनी केले. यामध्ये त्यांनी 50 लोकांपासून सुरू केलेला हा समूह आज 8000 पेक्षा जास्त लोकांचा समूह झाला असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. तसेच या समूहाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन ही केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
श्री .माधव जोशी सर (अध्यक्ष, जेष्ठ नागरिक संघ बारामती ) यांनी वाचनसाखळी समूह अतिशय उत्कृष्ट कार्य करत असून भविष्यात ज्या ज्या वेळी काही गरज लागेल त्यावेळेस आम्ही निश्चितच सहकार्य करू असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. श्री.विठ्ठल भुसारे, (शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद परभणी) यांनी आपल्या मनोगतात वाचनसाखळी समूहामध्ये बहुतांश शिक्षक असल्यामुळे त्यांच्या वाचनाचा विद्यार्थ्यांनाही भरपूर फायदा होत असल्याचे त्यांनी सांगितले तसेच वाचनसाखळी समूहाचा पुढील कार्यक्रम आपण परभणीमध्ये घ्यावा असे त्यांनी इच्छा व्यक्त केली. श्री.हनुमंत चांदगुडे
(पाठ्यपुस्तकातील कवी व गीतकार) यांनी आपल्या मनोगतात वाचनसाखळी समूहातील बरेचसे वाचक हे उत्कृष्ट पुस्तक परीक्षण करत असल्यामुळे अनेक लेखकांची पुस्तके वाचकापर्यंत पोहोचत असल्याचे आवर्जून सांगितले.त्याचप्रमाणे त्यांनी स्वतः लिहिलेल्या इयत्ता आठवीच्या मराठीच्या पुस्तकातील “आळाशी ” या कविताचा संदर्भही विविध उदाहरणे देऊन स्पष्ट केला.तसेच 100 पुस्तक वाचलेले आहेत त्याचे जर एक पुस्तक बनवले तर ते वाचकांना निश्चितच आवडेल असे त्यांनी आवर्जून सांगितले, श्री. रविंद्र टिळेकर सर (अधिव्याख्याता शिक्षणशास्र महाविद्यालय बारामती) यांनी आपल्या मनोगतात वाचन साखळी समूहातील अनेक परीक्षणाचा संदर्भ उच्च शिक्षणामध्ये ही अनेक जण घेत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले आणि जी माणसं केवळ सोशल मीडियाद्वारे भेटत होती.ती आज प्रत्यक्ष भेटल्याचा अनुभव हा स्वर्गीय अनुभव असल्याचा त्यांनी स्पष्ट केले. रवींद्रकुमार लटिंगे (सहसंयोजक, वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य) यांनी आपल्या मनोगतात आत्तापर्यंत वाचनसाखळी समूहावर 1000 पेक्षा जास्त पुस्तकांचे परीक्षण हे वाचकांनी केले असल्याचे आवर्जून स्पष्ट केले. पुरस्काराला उत्तर देताना श्री. मनोज अग्रवाल यांनी हा पुरस्कार अतिशय कष्टातून मिळाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुस्तक वाचत असताना अनेक ज्ञान प्राप्त झाले तसेच या समूहावर विविध भाषिक पुस्तके ही सर्वांनी वाचून समीक्षा करावी अशी त्यांनी आशा व्यक्त केली. दुसरे वाचनयात्री पुरस्कार प्राप्त राजू गरमडे यांनी आपल्या मनोगतात मला पुस्तक वाचण्यातून खूप आनंद मिळतो आणि मी भविष्यात 200 पुस्तकाचा टप्पा पार करेल असे आवर्जून सांगितले. गणेश तांबे (कार्याध्यक्ष, वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य) यांनी आपल्या मनोगतात पुस्तक वाचण्याने चांगले विचार, चांगले संस्कार घडतात. तसेच प्रत्येक घरात ज्याप्रमाणे एक देवालय असते त्याचप्रमाणे एक ग्रंथालयही असावे अशी असे व्यक्त केले व आपण चांगली पुस्तके वाचल्यानंतर आपल्या घरातील मुलेही चांगली पुस्तक वाचतात असे त्यांनी स्पष्ट केले.
श्री.कचरू चांभारे (प्रसिद्ध प्रमुख वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य) यांनी आपल्या मनोगतात वाचनसाखळी हा आता कौटुंबिक समूह तयार झाला असून भविष्यात वाचनसाखळी समूह आणखीन गरुडझेप घेईल असे मत व्यक्त केले. सदर कार्यक्रमात माजी सैनिक श्री.कृष्णात गोडसे (सातारा) यांनी नुकतेच 75 व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल त्यांचा सत्कार श्री.माधव जोशी सर यांच्या हस्ते करण्यात आला.सदर कार्यक्रम हा जेष्ठ नागरिक संघ सभागृह ,बारामती येथे यशस्वीरित्या संपन्न
झाला तो यशस्वी होण्यासाठी वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य कार्यकारी मंडळातील संयोजिका श्रीमती प्रतिभा लोखंडे,सहसंयोजक
श्री.रविंद्र लटिंगे ,कार्याध्यक्ष
श्री.गणेश तांबे, उपाध्यक्ष
श्रीमती.अंजली गोडसे, कोषाध्यक्ष श्री.लक्ष्मण जगताप,
प्रसिद्धीप्रमुख,श्री.कचरू चांभारे,
संपर्कप्रमुख श्रीमती. ज्योती कोहळे,श्रीमती पूनम कोसे (गुजर) इ. या कार्यक्रमासाठी विशेष प्रयत्न करत आहेत.
या कार्यक्रमाला विविध भागातून शिक्षक प्रेमी व वाचक प्रेमी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक ह.भ.प नवनाथ महाराज कोलवडकर यांनी केले व कार्यक्रमाचे आभार आत्मप्रेरणा पुस्तकाचे लेखक व वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्याचे कोषाध्यक्ष श्री.लक्ष्मण जगताप सर यांनी केले.