फलटण ( फलटण टुडे ) :
वाठार निंबाळकर गावचे सुपुत्र व बारामती येथील विद्या प्रतिष्ठान इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी येथील सहाय्यक प्राध्यापक श्री.सागर निंबाळकर यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नुकतीच पीएच.डी. पदवी प्रदान केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्या शाखेत ऑर्गनाईझशनल मॅनेजमेंट विषयात ” अ कंपॅरिटिव्ह स्टडी ऑफ ऑर्गनाइज्ड अँड अन – ऑर्गनाइज्ड फार्मसी रिटेल स्टोअर्स विथ स्पेशल रेफरन्स टू मुंबई अँड पुणे रिजन ” या प्रबंधासाठी सागर निंबाळकर यांना पीएच.डी प्रदान करण्यात आली आहे. याबद्दल वाठार निंबाळकर ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी विजयकुमार निंबाळकर सर (देऊर) यांनी डॉ.सागर सर यांना शुभेच्छा दिल्या व त्यांचा ज्ञानाचा गावातील विद्यार्थ्यांना फायदा व्हावा व मार्गदर्शन मिळावे अशी त्यांना विनंती केली. सचिन निंबाळकर यांनी डॉ.सागर सर यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या व वाठार निंबाळकर चे गाव नावलौकिक केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. गणेश तांबे सर यांनी सागर निंबाळकर यांच्या अथक प्रयत्नाबद्दल अभिनंदन करून त्यांच्या ज्ञानाचा गावासाठी जास्तीत जास्त उपयोग व्हावा व त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सत्काराला उत्तर देताना डॉ. सागर निंबाळकर यांनी आपली शैक्षणिक प्रवास या ठिकाणी व्यक्त केला. त्याचप्रमाणे वाठार निंबाळकर गावातील शैक्षणिक कार्यात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले व विद्यार्थ्यांना नेहमी मार्गदर्शन करू असेही सांगितले. या कार्यक्रमा प्रसंगी श्री.राजीव (साहेब) नाईक निंबाळकर, पंडित (काका)नाईक निंबाळकर, विजयकुमार निंबाळकर, संतोष (दादा ) निंबाळकर,संदीप निंबाळकर संतोष तरटे, सचिन निंबाळकर गणेश तांबे इत्यादी उपस्थित होते. डॉ.सागर निंबाळकर यांचे वडील श्री.गजानन निंबाळकर यांनी सर्वांचे आभार मानले.