“आर्यनमॅन “खेळाडूचा सन्मान करताना डॉ.पांडुरंग गावडे व डॉ उज्वला गावडे
बारामती ( फलटण टुडे ) :
जिद्द, चिकाटी, व आत्मविश्वासाच्या जोरावर व खराब हवामान असताना सुद्धा बारामती च्या सुपुत्रांनी कझाकिस्तान मध्ये आर्यनमॅन किताब मिळवून बारामती चे नाव उजव्व्ल केले हि अभिमानाची बाब असून प्रत्येक खेळाडूंनी विनम्रता व खिलाडू वृत्ती जीवनभर बाळगावी असे प्रतिपादन आर्यनमॅन डॉ पांडुरंग गावडे यांनी केले.
गावडे हॉस्पिटल या ठिकाणी कझाकिस्तान येथे आर्यनमॅन झालेल्या खेळाडूचा सत्कार (रविवार 21 ऑगस्ट ) समारंभाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी डॉ. पांडुरंग गावडे बोलत होते यावेळी अभिषेक ननवरे, ओम सावळेपाटील, अवधूत शिंदे, मयूर आटोळे, डॉ वरद देवकाते, राजेंद्र ठवरे, विपुल पटेल युसूफ कायमखाणी व हाल्फ आर्यनमॅन विजेता दिग्विजय सावंत आदी चा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी बारामती सायकल क्लब चे सर्व सदस्य उपस्तित होते
तालुका असून सुद्धा मोठ्या प्रमाणावर युवक आर्यनमॅन स्पर्धेत सहभागी होत आहेत हे कौतुकास्पद आहे
आरोग्या साठी जनजागृती होत असल्याबद्दल डॉ पांडुरंग गावडे यांनी समाधान व्यक्त केले.
देशाचे व बारामती चे नाव मोठे करण्याच्या उद्देश्याने व स्वतः ला सिद्ध करण्यासाठी सदर स्पर्धे मध्ये सहभाग घेऊन खराब हवामान असताना पळणे, पोहणे व सायकल स्पर्धा पूर्ण करून जिद्दीने आर्यनमॅन पुरस्कार प्राप्त केल्याचे आर्यनमॅन किताब पटकवणाऱ्या युवकांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले.
या प्रसंगी जलतरण पट्टू व प्रशिक्षक सुभाष बर्गे यांचाही सत्कार करण्यात आला.
सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील व आभार डॉ उज्वला गावडे यांनी मानले.
—————————————–