कु.वैभवी यशपाल भोंसले-पाटील इयत्ता १० वी सी.बी.एस.सी.बोर्ड परीक्षेत ९९% गुण मिळवून सर्वप्रथम

 फलटण दि.१९ (फलटण टुडे ) : 
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडीयम सी.बी.एस.सी.बोर्ड स्कूलची विद्यार्थिनी कु.वैभवी यशपाल भोंसले-पाटील ही इयत्ता १० वी सी.बी.एस.सी.बोर्ड परीक्षेत ९९% गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली असून तिचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
       फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा), तहसिलदार समीर यादव साहेब यांनी कु.वैभवीचे पुष्पगुच्छ व पेढे देवून अभिनंदन केले. कु.वैभवी भोंसले-पाटील हिने इंग्रजीमध्ये ९७, हिंदी कोर्स बी मध्ये ९९, गणितात १००, शास्त्र १०० आणि सोशल सायन्स मध्ये ९९ असे एकूण ४९५ गुण मिळविले आहेत.
       फलटणचे लोकनियुक्त नगराध्यक्ष स्व.अँड.स.रा.तथा बापू भोंसले-पाटील यांची पंती, अँड.विजयसिंह तथा छोटू काका सखाराम भोंसले-पाटील यांची नात आणि यशपाल विजयसिंह भोंसले-पाटील यांची सुकन्या कु.वैभवी भोंसले-पाटील हिने मिळविलेल्या या यशाबद्दल तिचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
       दरम्यान फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडीयम सी.बी.एस.सी.बोर्ड स्कूल मधून या परीक्षेस १०५ विद्यार्थी बसले होते, प्रशालेचा निकाल ९४.२८% लागला आहे.
       ९९% गुण मिळवून कु.वैभवी भोंसले-पाटील विद्यालयात प्रथम, ९७% गुण मिळवून चि.निखिल विजय शिंदे द्वितीय, ९६.४% गुण मिळवून चि.श्रवण नेताजी निंबाळकर आणि चि.शंभूराज महेश साळुंखे तृतीय, ९६% गुण मिळवून चि.क्षितिज रविकिरण राऊत आणि कु.शिवश्री भूपेश जाधव चतुर्थ, ९५.४% गुण मिळवून कु.कार्तिकी जयदीप भोंसले-पाटील आणि चि.वरद विकास पवार पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. या विद्यार्थ्यांसह सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे.
       सर्व यशस्वी विद्यार्थी, विद्यार्थिनी यांचे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब), आमदार दिपकराव चव्हाण साहेब, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर (बाबा), श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा), प्रशासनाधिकारी अरविंद निकम सर, अधिक्षक श्रीकांत फडतरे, प्रिंसिपॉल सौ.मिनल दिक्षीत मॅडम यांनी अभिनंदन केले.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!