सातारा दि. 18 (फलटण टुडे वृत्तसेवा ) : सातारा जिल्ह्यात खरिप हंगामात 3 लाख 10 हजार 441 हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी झाली आहे. खरीप हंगामावरच जिल्ह्यातील शेतकऱ्यांची भिस्त असल्याने खतांना मागणी मोठ्या प्रमाणावर असते. जिल्ह्यात खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी रासायनिक खत पुरवठ्याचे काटेकोर नियोजन केलेले आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात युरिया-17 हजार 218 मे. टन, डीएपी- 7 हजार 45 मे. टन, एमओपी-160 मे.टन, एसएसपी-1 हजार 538 मे. टन व संयुक्त खत – 13 हजार 670 मे. टन असा एकूण 39 हजार 631 मे. टन खताचा साठा उपलब्ध आहे.
खत विक्रेत्यांची मागणी उपलब्ध होताच त्यांना युरिया व डिएपी उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. रासायनिक खतांची साठेबाजी किंवा जादा दराने विक्रीबाबत तक्रार असल्यास शेतकऱ्यांनी संबंधीत तालुका कृषि अधिकारी किंवा कृषि विभागाच्या जिल्हा स्तरावरील नियंत्रण कक्षाशी सपंर्क ( मो.क्र. 7498921284) करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विजयकुमार राऊत यांनी केले आहे.