राज्यस्तर मैदानी क्रीडा स्पर्धेकरिता निवड झालेल्या खेळाडूंचे जिल्हाधिकाऱ्यांकडून अभिनंदन

 

            सातारा दि. 18 (फलटण टुडे वृत्तसेवा ) :
 खेलो इंडिया योजनेतून सातारा जिल्ह्यामध्ये मैदानी खेळाडूंनी मौजे सासवड, ता. फलटण येथे झालेल्या जिल्हास्तर मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये उच्चतम कामगिरी केली. एकूण 14 खेळाडूंची मुंबई  व नाशिक येथे होणाऱ्या राज्यस्तर मैदानी क्रीडा स्पर्धेकरिता निवड झाली आहे. निवड झालेल्या खेळाडूंचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्यामार्फत अभिनंदन करण्यात आले व पुढील स्पर्धेकरिता  शुभेच्छा दिल्या.
 
            यावेळी आंतरराष्ट्रीय खेळाडू सुदेष्णा शिवणकर व अनुष्का कुंभार यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
            यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक, क्रीडा मार्गदर्शक (खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्र) बळवंत बाबर, क्रीडा मार्गदर्शक व पालक उपस्थित होते.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!