फलटण (फलटण टुडे ):
येत्या महिन्या अखेरीस येऊन ठेपलेल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव म्हणजे गणेशोत्सव या उत्सवाच्या अनुषंगाने फलटण तालुक्यातील तसेच फलटण शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष तसेच सर्व पक्षाचे पदाधिकारी शांतता कमिटी सदस्य यांच्या बैठकीचे
आयोजन करण्यात आले आहे .
उद्या गुरुवार दिनांक १८ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ११
वा. प्रियदर्शनी इंदिरा गांधी संस्कृती भवन च्या पाठीमागील नवीन हॉल मध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजीराव बरडे तसेच प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांचे अध्यक्षते खाली बैठकीचे नियोजन केले आहे.
तरी या बैठकीस तालुक्यातील सर्व गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष तसेच सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी शांतता कमिटी सदस्य यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन फलटण शहर,फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने करण्यात आले आहे.