व्याख्यान देताना डॉ. प्रभाकर पवार व इतर मान्यवर
फलटण ( फलटण टुडे ) :
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ,कामगार कल्याण केंद्र सातारा यांच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त ‘घर-घर तिरंगा’या कार्यक्रमाचे आयोजन श्रीराम बाजार, फलटण येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री अनंत पाटील साहेब, जनरल मॅनेजर ,होते तर प्रमुख व्याख्याते म्हणून मुधोजी महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख व श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँकेचे विद्यमान संचालक माननीय प्रा.डॉ.प्रभाकर पवार सर यांनी घर घर तिरंगा यावर मार्गदर्शन केले. घर घर तिरंगा या विषयी मार्गदर्शन करताना करताना डॉ. प्रभाकर पवार सर यांनी आपल्या राष्ट्रध्वजाचे महत्व अतिशय प्रभावी पद्धतीने सांगितले.या वेळी बोलताना ते म्हणाले की आपण आपल्या राष्ट्रध्वजाची अस्मिता आपल्या हृदयाप्रमाणे जोपासली पाहिजे जेणेकरून आपली पुढील पिढी देखील त्याचे महत्व समजेल.
कार्यक्रमास मोठयासंख्येने कामगार वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक व आभार श्री संदीप कांबळे , केंद्र संचालक कामगार कल्याण केंद्र , सातारा यांनी केले . कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सोमनाथ चोरगे ,सौ सुजाता जाधव, सौ तृप्ती निकम ,सौ जयश्री साळुंखे , सौ ज्योती मोरे या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.