बारामती ( फलटण टुडे )
तालुक्यातील वंजारवाडी येथील नवीन अंगणवाडीचे भूमिपूजन सरपंच सौ किरण जगताप यांचे शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी आदर्श उपसरपंच विनोद चौधर,सदस्या सौ रेश्मा खोगरे, सौ वैशाली चौधर, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष चौधर, पोलीस पाटील पोपट चौधर, ग्रामसेवक एन.एन. लव्हटे, जि प शाळा वंजारवाडी मुख्यध्यपिका सौ सुरेखा भालेराव व सर्व शिक्षक वृंद, ग्रामपंचायत वंजारवाडी सर्व कर्मचारी आणि ग्रामस्थ बंडू खोगरे , संपत चौधर, बापूराव चौधर, रोहिदास चौधर रणजित जगताप, भगवान चौधर आदी मान्यवर उपस्तित होते. आदर्श उपसरपंच पुरस्कार विनोद चौधर यांना मिळाल्याबद्दल या वेळी ग्रामस्थांनी सन्मान केला.