कटफळ येथे स्वातंत्रदिन अमृतमहोत्सव निमित्त विविध कार्यक्रम संपन्न

बारामती (फलटण टुडे ) :
कटफळ येथे ग्रामपंचायतीच्या वतीने १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत विविध कार्यक्रम पार पडले. यामध्ये गावातील प्रत्येक कुटुंबास तिरंगा ध्वजाचे मोफत वाटप करण्यात आले व नागरिकांनी प्रत्येकाच्या घरावर ध्वज फडकावला. व १३ ऑगस्ट रोजी गरूडा गुळीक यांचा देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. १४ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता गावातील स्थानिक मुलांसाठी १ कि.मी मेराॅथाॅन स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती यामध्ये १६० मुलांनी सहभाग घेतला व त्यानंतर ५ कि.मी मेराॅथाॅन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ४३० स्पर्धकांनी भाग घेतला होता.या स्पर्धेत प्रथम क्रमांक मल्हारी मोघे  
व दुसरा क्रमांक हरिभाऊ सोलनकर व तिसरा क्रमांक राहुल शेळके यांनी  पटकावला. या स्पर्धेत मुलींनी देखील सहभाग नोंदवला होता सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र व मेडल ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आले. सायंकाळी ७ वाजता होममिनिस्टर महिला स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महिलांनी विवीध खेळात भाग घेतला व विजेत्या महिलांना पैठणी देण्यात आली. महिलांसाठी रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.विजेत्यांना बक्षिस वितरण करण्यात आले. व गावातील जिल्हा परिषद शाळा , अजितदादा इंग्लिश मिडीयम स्कुल व झेनुबिया स्कुल यामधील विद्यार्थ्यांचा देशभक्तीपर सांस्कृतिक गाण्यांचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमास महिलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. १५ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत समोर ७५ फुट तिरंगा मध्ये भव्य रांगोळी काढण्यात आली होती. ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या सर्व कार्यक्रमासाठी ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. यादरम्यान गावचे सरपंच पुनम किरण कांबळे , उपसरपंच सिमा सिताराम मदने, सदस्य डाॅ.संजय मोकाशी , संग्रामसिंह मोकाशी, तात्याराम रांधवण, विजय कांबळे, संध्या मोरे , संध्याराणी झगडे , सविता लोखंडे, ग्रामविकास अधिकारी हौशीराम पोंदकुले,जहांगीर तांबोळी व गावातील पदाधिकारी व ग्रा.पं.सर्व कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!