फलटण (फलटण टुडे ) दि. १५ :
फलटण एज्युकेशन सोसायटी च्या मुधोजी प्राथमिक विद्यामंदिर मध्ये १५ ऑगस्ट रोजी सकाळी इयत्ता तिसरी व इयत्ता चौथीचे विद्यार्थी यांची प्रभात फेरी झाली त्यानंतर शाळेत आल्यावर शाळा समितीच्या चेअरमन मा. वसुंधरा राजीव नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांचे भाषण, नृत्य, पेटी हार्मोनियम वादन इत्यादी घेण्यात आले यामध्ये सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषा करून आलेल्या एका लहान गटातील विद्यार्थिनी स्त्रिया विषयी जीवनातील घटना स्त्रियावर होणारा तिरस्कार इत्यादी विषयी माहिती सादर केली तसेच देशभक्तीपर गीत यावर नृत्य करण्यात आले पेटी हार्मोनियम वाजून स्फूर्ती गीत सादर करण्यात आले सामाजिक शैक्षणिक इत्यादी कार्य विद्यार्थ्यांनी भाषणातून सादर केले. यावेळी कार्यक्रमात सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर शाळा समितीचे चेअरमन मा. सौ. वसुंधरा राजीव नाईक निंबाळकर, श्रीमती निर्मला सतीश रणवरे निमंत्रित सदस्या, माननीय मुख्याध्यापक श्री शिंदे सर मुधोजी प्राथमिक विद्यामंदिर, नवीन प्राथमिक, मुधोजी बालक मंदिर, माझे घर इत्यादी शाळेतील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.