फलटण एज्युकेशन सोसायटीचे महात्मा फुले कृषी विद्यापिठ, राहुरी मान्यताप्राप्त श्रीमंत शिवाजीराजे
उद्यानविद्या महाविद्यालय, फलटण व कृषि महाविद्यालय, फलटण धानुका अॅग्रिटेक लि., मध्यवर्ती ऊस
संशोधन केंद्र, पाडेगाव, श्रीराम सहकारी साखर कारखाना लि. फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऊस
पिक परिसंवाद या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष, जिल्हा परिषद साताराचे
माजी अध्यक्ष, फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटणचे सेक्रेटरी मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, हे ऊस
पिक परिसंवाद या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते व उद्घाटक म्हणुन उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये
मार्गदर्शन करताना फलटण व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी जमिनीची सुपिकता कायम राखुन कमी खर्चामध्ये
ऊसाचे अधिकतम उत्पादन घ्यावे. असे आवाहन मा श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी शेतकऱ्यांना
उद्देशून केले. तसेच फलटण परिसरातील आडसाली ऊसाचे क्षेत्र याबाबत शेतकऱ्यांनी अधिकतम कृषि
तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात यावा. फलटण परिसरातील वारंवार ऊस लागवडीमुळे निर्माण होणारा क्षारपड
जमिनीचा प्रश्न याबाबत मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी खंत व्यक्त केली. या कार्यक्रमा
दरम्यान श्री. किरण कांबळे, मुख्य शेतकी अधिकारी, जवाहर सहकारी साखर कारखाना लि., हुपरी यांनी
शेतकऱ्यांना संबोधित करताना ऊस या पिकातील अन्नद्रव्य व्यवस्थापन, ऊस शेतीतील खोडवा व्यवस्थापन
करताना अवलंबवयाचे तंत्रज्ञान या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.
महाराष्ट्र राज्य कृषि भुषण पुरस्कार प्राप्त श्री. संजीव माने यांनी ऊस पिक परिसंवाद या
कार्यक्रमाला उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवली. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना श्री. संजीव माने
यांनी ऊस शेतातील अलिकडील काळात प्रसिध्द झालेली एक डोळा पध्दत लागवड तंत्रज्ञान, ६ फुटी रुंद
सरी पध्दत लागवड तंत्रज्ञान, ऊस पिकातील पाचट व्यवस्थापन व शाश्वत जमिनीची सुपिकता टिकविणे,
ऊस या पिकातील एकरी शंभर टन उत्पादन तंत्रज्ञान, ऊस या पिकातील पट्टा लागवड पध्दत व पारंपारिक
ऊस लागवड तंत्रज्ञान हे मुद्दे सविस्तर विषद केले. धानुका ॲग्रिटेक लि. या कंपनीचे विषय तज्ञ व वरिष्ठ
उपव्यवस्थापक श्री घनश्याम इंगळे यांनी शेतकऱ्यांना संबोधित करताना ऊस या पिकातील लव्हाळा या
तणामुळे होणारे ऊसाचे आर्थिक नुकसान व व्यवस्थापन, लव्हाळा या तणाचे रासायनिक पध्दतीने करण्यात
येणारे नियंत्रण, ऊस या पिकामध्ये वापरण्यात येणारी जीवाणू खते, ऊस पिकांतील जिवाणू खताद्वारे
करण्यात येणारे पालन पोषण या विषयांवर शेतकऱ्यांना सखोल असे मार्गदर्शन करण्यात आले.
डॉ. भरत रासकर, प्रमुख शास्त्रज्ञ, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन
करताना मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगावची प्रगती व आढावा, पाडेगाव ऊस संशोधन केंद्राने संशोधित
केलेले ऊसाचे सुधारीत वाण व गुणवैशिष्टये, ऊसातील सेंद्रिय पध्दतीने पाचट व्यवस्थापन, ऊस या
पिकातील अन्नद्रव्य व्यवस्थापन, ऊस पिकातील महात्मा फुले कृषी विद्यापिठ, राहुरी यांनी शिफारशीत
केलेली आधुनिक ऊस लागवड तंत्रज्ञान पध्दत, ऊसातील खोडवा व लव्हाळा व्यवस्थापन, ऊस पिकाचे
एकरी शंभर टन लक्ष्य साध्य करण्यासाठी अवलंब करावयाचे सुधारीत लागवड तंत्रज्ञान या विविध
विषयावर सखोल असे विश्लेषण करण्यात आले.
फलटण व परिसरातील ऊस शेतीमधील आधुनिक लागवड तंत्रज्ञान, ऊस पिकाचे एकरी शंभर टन
उत्पादन साध्य करणे, ऊसातील जिवाणू खताव्दारे अन्नद्रव्य व्यवस्थापन अशा विविध मुद्दे लक्षात घेवुन ऊस
पिक परिसंवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. फलटण व परिसरातील अधिकतम शेतकऱ्यांनी या
कार्यक्रमाला उपस्थिती लावुन ऊस पिकाबददल सविस्तर असे मार्गदर्शन घेतले. सदरील कार्यक्रमासाठी
प्रमुख उपस्थिती म्हणुन मा. डॉ. बाळासाहेब शेंडे, चेअरमन, श्रीराम सहकारी साखर कारखाना लि. फलटण,
श्री. भास्कर कोळेकर, उपविभागीय कृषि अधिकारी, फलटण, श्री. सागर डांगे, तालुका कृषि अधिकारी, फलटण,
श्री. संजय इखार, श्री. सुशांत भुजे, श्री. प्रदिप बनसुडे, श्री. सतिश वायाळ, श्री महेश दारुळे धानुका अॅग्रिटेक
लि., मा. श्री. शरदराव विश्वासराव रणवरे, व्हाईस चेअरमन, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय
समिती, फलटण मा.श्री. रणजित रामचंद्र निंबाळकर, सदस्य श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय
समिती, फलटण मा.श्री. रामदास भुजंगराव कदम, निमंत्रित सदस्य, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या
महाविद्यालय समिती, फलटण, मा. श्री. अरविंद निकम, फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी,
मा. श्री. नितीन शाहुराज भोसले, व्हाईस चेअरमन, श्रीराम सहकारी साखर कारखाना लि. फलटण, मा. श्री.
यशवंत माधवराव सुर्यवंशी, संचालक, श्रीराम सकहारी साखर कारखाना लि. फलटण, मा. श्री. दत्तात्रय शंकर
शिदें, संचालक, श्रीराम सकहारी साखर कारखाना लि. फलटण, मा. श्री. विठ्ठल दादा गौंड, संचालक, श्रीराम
सकहारी साखर कारखाना लि. फलटण, मा. श्री महादेव साहेबराव माने, संचालक, श्रीराम सकहारी साखर
कारखाना लि.फलटण, मा. श्री. अशोक दगडू सोनवणे, संचालक, श्रीराम सकहारी साखर कारखाना लि.
फलटण, मा. श्री.सी.डी. तळेकर, कार्यकारी संचालक, श्रीराम सकहारी साखर कारखाना लि. फलटण, आदी
मान्यवर उपस्थित होते.
सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदरणीय प्राचार्य डॉ. एस. डी. निबांळकर श्रीमंत शिवाजीराजे
उद्यानविद्या महाविद्यालय, फलटण व कृषि महाविद्यालय, फलटण यानी केले व कार्यक्रमाचे आभार डॉ. गणेश
अडसुळ, सहाय्यक प्राध्यापक, कृषि महाविद्यालय, फलटण यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी
महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांनी विशेष असे प्रयत्न केले.