गोखळी ( फलटण टुडे):
फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील गोखळी ग्रामस्थांच्या वतीने देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने” हर घर तिरंगा “चे औचित्य साधून आजी – माजी सैनिक यांचा सन्मान म्हणुन प्रत्येक सैनिकाच्या घरी जाऊन त्यांचा शाल – श्रीफळ व तिरंगा ध्वज देऊन देशसेवक माजी सैनिक गोविंद भाऊ जाधव, अशोक सगन जगताप, तानाजी भीमराव कांबळे, राजाराम लक्ष्मण घाडगे, दत्तात्रय तुकाराम जगताप, मयूर शांतीलाल गावडे यांचे कुटुंबीय, अशोक सर्जेराव फडतरे यांचे कुटुंबीय, सचिन पांडुरंग माने यांचे कुटुंबीय, सूरज बाबसो मांढरे यांचे कुटुंबीय यांचा सन्मान माजी सरपंच नंदकुमार गावडे मामा , माजी उप सरपंच डॉ अमित गावडे व ज्ञानेश्वर घाडगे, खटकेवस्ती गावाचे माजी सरपंच रघुनाथ ढोबळे, लहुजी शक्ती सेना तालुका अध्यक्ष आकाश बागाव, सामाजिक कार्यकर्ते राहुल गावडे, श्रीकांत जाधव, मुन्ना शेख, शेखर लोंढे, अभिषेक अटोळे, ऋषिकेश बागाव, किरण हरीहर, राहूल आढव, अर्जुन जगताप, बबन जगताप यांचे उपस्थितीत करण्यात आला.