गोखळी (फलटण टुडे ):
फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील गोखळी येथे”हर हर तिरंगा” प्रबोधन प्रभात फेरी काढण्यात आली यामध्ये गोखळी गावातील अंगणवाडी, प्राथमिक शाळा, हनुमान माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स, पालक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, पोलिस पाटील,गावकामगार तलाठी, ग्रामविकास अधिकारी व ग्रामस्थांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने काढण्यात आलेल्या प्रभातफेरी मध्ये सहभागी झाले होते. महोत्सवानिमित्त ‘ *घरोघरी तिरंगा* ‘ या उपक्रमाच्या जनजागृतीसाठी प्रभातफेरी चे आयोजन करण्यात आले होते.प्रभात फेरी मध्ये विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा साकारल्याने नागरीकांचे लक्ष वेधून घेत होते.