सह्याद्री हा भूतलावरील अद्भुत ठेवा आहे: अभिजित घोरपडे

जळोची  : ( फलटण टुडे वृत्तसेवा )
 सह्याद्री हा फक्त महाराष्ट्रातील नाही तर भूतलावरील  अद्भुत ठेवा आहे. सह्याद्रीतील प्रत्येक झाडं, फुल, फळ, प्राणी नद्या नाले या जगातील सर्वोत्तम आणि विलक्षण आहे. आपन भाग्यवान आहोत असा ठेवा आपल्या महाराष्ट्राला लाभला आहे. त्याचे जतन करणे हे फक्त शासनाचे नाहीतर प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचे  पर्यावरण अभ्यासक  अभिजीत घोरपडे यांनी सांगितले  केले .
मंगळवार दि. 08 ऑगस्ट रोजी  बारामती ट्रेकर्स क्लब च्या चौथ्या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्ताने बोलत होते.या प्रसंगी ऍड  हरिष कुंभरकर ,  शशांक मोहिते,विपुल पाटील,  नायब तहसीलदार  तुषार बोरकर, बारामती ट्रेकर्स क्लब चे अध्यक्ष ऍड.सचिन वाघ, प्रताप पागळे  आदी मान्यवर उपस्तित होते. 
तरुण पिढीने  ट्रेकिंग करत असताना फक्त टाईमपास म्हणून न करता पर्यावरणाची आवड जोपासली पाहिजे. पर्यावरणातील होणारे बदल हे मानवासाठी धोकादायक आहे. त्यामुळे निसर्ग संवर्धन करायचे असल्यास आधी त्याबद्दल आवड निर्माण होने गरजेचे आहे. आणि त्यासाठी निसर्गवाचन आणि त्याचा अभ्यास ही गोष्ट महत्वाची आहे असेही घोरपडे यांनी सांगितले 

 पर्यावरण  तज्ञ डॉ. महेश गायकवाड यांनी स्थानिक वृक्षप्रजातीची होणारी वृक्षतोड ही धोकादायक आहे. तर नवीन वृक्षारोपण करताना देखील स्थानिक प्रजातीची झाडें न लावल्यामुळे स्थानिक प्राणी,पक्षी, कीटक, सरपटणारे प्राणी यांच्या प्रजनन प्रक्रियेवर देखील गंभीर परिणाम होतं आहे. यामुळे आपल्या जैवविविधतेवर गंभीर परिणाम होतं असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. 
या कार्यक्रमात बारामती ट्रेकर्स ग्रुप चे फोटोग्राफरं  ऋतुराज काळकुटे व  राहुल जगताप यांचा त्यांनी ट्रेक दरम्यान केलेल्या नर्सग फोटोग्राफी साठी विशेष सन्मान करण्यात आला. पदमकांत निकम, प्रशांत राजपुरे , प्रशांत ढवळे , विकास गायकवाड, सौरभ घाडगे यांनी कार्यक्रम यशस्वी होणेसाठी परिश्रम घेतले 
 बारामती ट्रेकर्स  चे   ऍड. योगेश वाघ यांनी केली प्रस्तावना व  सूत्रसंचालन ऍड. राहुल झाडे तर आभार श्री प्रशांत पवार यांनी मानले
 
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!