मौजे पाडेगाव ता. फलटण गावचे हद्दीत शिवचा मळा येथे फिर्यादीचे रहाते घरासमोर उघड्यावर अंगणात फिर्यादी निळकंठ उर्फ गणेश नारायण मोहिते यांचा लहान भाऊ राहुल नारायण मोहिते वय ३१ वर्षे, रा. पाडेगाव शिवचामळा ता. फलटण हा घराबाहेरील लोखंडी कॉटवर झोपला असताना कोणीतरी अज्ञात इसमांनी कोणत्यातरी कारणावरुन गळ्यावर धारधार शस्त्राने वार करुन खुन केला होता त्याबाबत लोणंद पोलीस ठाणेस खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला होता.
गेले तीन महिन्यापासुन उघडकिस न आलेल्या अत्यंत गुंतागुंतीचे खुनाचे गुन्हा उघडकिस आणणे हे पोलीसांचे समोर मोठे आव्हान होवुन बसले होते. या खुनाचे गुन्हयाकडे सातारा जिल्हयातील सर्वांचे लक्ष लागून होते. सदर झालेल्या खुनाचे घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्री. अजयकुमार बंसल, तसेच अपर पोलीस अधीक्षक, श्री. अजित बो-हाडे व उपविभागीय पोलीस अधिकारी, श्री तानाजी बरडे यांनी तपासाबाबत वेळोवेळी घटनास्थळी व पोलीस स्टेशनला भेट देवुन योग्य त्या सुचना व मार्गदर्शन केले होते.
गुन्हयाचा तपास चालू असताना सहायक पोलीस निरीक्षक श्री विशाल के. वायकर, व त्याचे सहका-यांनी मिळाले गोपनिय माहिती व तांत्रीक विश्लेषणाचे आधारे
आरोपींची कठोर परिश्रमानंतर नावे निष्पन्न करुन गुन्हयाचे तपासकामी चार आरोपी व एक विधीसंघर्षग्रस्त बालक यांचा सहभाग निष्पन्न व आरोपींची कठोर परिश्रमानंतर नावे निष्पन्न करुन गुन्हयाचे तपासकामी खुनाचा गुन्हा उघडकिस आणला आहे.
गेले तीन महिन्यापासुन गुन्हयातील आरोपी हे पोलीसांना गुंगारा देत होते. आरोपीचे दहशतीमुळे गावातील तसेच परिसरातील कोणीही माहिती देण्यास तयार होत नव्हते. आरोपीची संपुर्ण माहिती लोणंद पोलीस स्टेशनचे पो हवा. अविनाश नलवडे, पो का विठ्ठल काळे, पो ना कदम यांनी खब-या मार्फत माहिती प्राप्त करुन सहा. पोलीस निरीक्षक
वायकर यांना दिली. त्यानंतर विशाल वायकर व सहका-यांनी सदर माहितीचे आधारे व तांत्रीक विश्लेषणाचे आधारे तपासाची वेगाने सुत्रे हालवुन प्रकाश ऊर्फ अजित किसन गोवेकर रा कोरेगाव ता.फलटण, दत्ता मारूती सरक रा. पाडेगाव ता.फलटण, योगेश श्रीरंग मदने रा.कोरेगाव ता फलटण, गणेश बापू कडाळे रा. पाडेगाव ता. फलटण व एक अल्पवयीन अशा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले.
मा.उपविभागीय पोलीस अधिकारी, फलटण श्री. तानाजी बरडे यांनी आरोपीना कौशल्यरित्या विचारपुस करुन गुन्हयाचा तपशीलवार घटनाक्रम उघडकिस आणला असुन आरोपींनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपीची पोलीस कोठडी घेवुन गुन्हा कोणत्या कारणासाठी, कोणत्या हत्याराने केला याबाबत तपास करण्यात येणार आहे.