जिल्हास्तरीय स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील 5 तालुक्यातील 196 खेळाडूंनी सहभाग नोंदवला
बारामती (फलटण टुडे ) :
या स्पर्धेत विद्या प्रतिष्ठना बिल्ट विद्यालय भिगवण(इंदापूर तालुका), दौंड तालुका, शिरूर तालुका व शिरूर युनिट 2, बारामती तालुका इत्यादी 5 तालुक्यातील खेळाडूंनी सहभाग नोंदवला, या स्पर्धेत प्रथम क्रमांक बारामती तालुका, दुतीय क्रमांक दौंड तालुका, तृतीय क्रमांक शिरूर तालुका, चौथा क्रमांक शिरूर युनिट 2, व उत्तेजनार्थ इंदापूर तालुक्याला (vp बिल्ट स्कुल भिगवण) मिळाला, ही स्पर्धा पार पढण्यासाठी महाराष्ट्र पिंच्याक सीलाट असोशिएशन चे इंटरनॅशनल रेफरी व एशियन मेडिलिस्ट श्री.अनुज सरनाईक,इंटरनॅशनल खेळाडू वैभव काळे, व नॅशनल खेळाडू रामचंद्र बदक यांनी स्पर्धेत रेफरी चे काम केले, योध्दा स्पोर्ट्स क्लबचे आद्यक्ष श्री अक्षय काका थोरात सेक्रेटरी साहेबराव ओहोळ सर व खजिनदार श्री भोसले सर यांनी आलेल्या सर्व मुलांचे स्वागत केले, ही स्पर्धा रेग्यु, तुंगल, गंडा व फाईट अश्या एकूण चार प्रकारात पार पडली . या स्पर्धेत बारातमी तालुक्याच्या योध्दा स्पोर्ट्स क्लबच्या मुलांनी प्रथम क्रमांक मिळवला , दौंड तालुक्याने दुतीय क्रमांत व तृतीय क्रमांक शिरूर तालुक्याने मिळवला
हा खेळ इंडोनेशियन मार्शल आर्ट प्रकारचा खेळ आहे.
1 सप्टेंबर 2020 ला या खेळाला चा समावेश भारतीय क्रीडा मंत्रालय भारत सरकार यांनी आपल्या राखीव नोकर भरती मध्ये केला आहे. या खेळाला युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालय भारत सरकार, भारतीय विश्वविद्यालय संघ, अखिल भारतीय पोलीस खेळ नियंत्रण बोर्ड , ऑलम्पिक कौन्सिल ऑफ इंडियाची मान्यता आहे. हा खेळ एशियन गेम, भारतीय विश्वविद्यालय संघ अशा ऑफिशियल राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळला जातो आम्ही ऑल पुणे ग्रामीण ची स्थापना करून आपल्या बारामती जिल्ह्यामध्ये या खेळाचा विस्तार विकास करत आहोत.
श्री किशोर मासाळ यांनी सर्व स्पर्धकांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या